टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

आमदार बाबासाहेब देशमुख यांनी दाखवला मनाचा मोठेपणा; चालक-वाहक व सामांन्य प्रवाशी यांच्या हस्ते नवीन बसेसची पुजा;

सांगोला (प्रतिनिधी):- आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेत गोरगरीब नागरीकांच्या प्रवासाची अडचण लक्षात घेऊन विधानसभेच्या अधिवेशनात नवीन एस.टी.बसेसची मागणी केलेली होती. तसेच एस.टी महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रताप सरनाईक यांच्या कडे सुध्दा पाठपुरावा केला होता.

आमदार देशमुख यांच्या या मागणीचा विचार करुन राज्य सरकारने सांगोला आगारास नविन पाच बसेस दिल्या त्या बसेसचे पुजन आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते करण्याचे आयोजन आगार प्रमुखाऩी केले होते. परंतु आमदार देशमुख यांनी या मात्र नवीन बसेसची पुजा सांगोला आगाराचे चालक वाहक व कर्मचारी यांच्या व सामान्य प्रवाशांच्या हस्ते करण्याच्या आगर प्रमुखांना सुचना दिल्या.

त्यांच्या सुचनांने चालक, वाहक व कर्मचारी व प्रवाशी वर्ग अचंबित झाले. व या आलेल्या नवीन पाच बसेसचे पुजन आमदार देशमुख यांच्या सुचनेनुसार सर्वसामान्य चालक- वाहक, कर्माचारी व प्रवाशी वर्ग यांच्या हस्ते झाल्याने सांगोला आगारात आमदार बाबासाहेब देशुमख यांच्या या कृतीने सर्व जण चकीत झाले असल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now