टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

MI vs RR : राजस्थानची विजयासह प्लेऑफमध्ये धडक, मुंबईचा 30 धावांनी धुव्वा, पलटणचा पराभवाने शेवट

Mumbai Indians vs Rajasthan Royals Match Result, IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्ससमोर वानखेडे स्टेडियममध्ये 206 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. राजस्थानने हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये धडक दिली आहे.

Mumbai Indians vs Rajasthan Royals IPL 2026 : आयपीएल 2026 च्या 69 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर, म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर 30 धावांनी धूळ चारली. राजस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईच्या या पराभवामुळे त्याचसोबत लीग स्टेजच्या शेवटच्या टप्प्यात इतर मुंबईकर खेळाडूंच्या दोन संघांचा प्रवासही अधिकृतपणे संपला आहे.

 

मुंबईकर कर्णधारांचे संघ स्पर्धेतून बाहेर

या वेळची आयपीएल मुंबईच्या चाहत्यांसाठी दुहेरी धक्का देणारी ठरली आहे. मुंबईकर खेळाडूंचे नेतृत्व असलेल्या दोन आघाडीच्या संघांना प्ले-ऑफ गाठण्यात अपयश आले आहे. अजिंक्य रहाणेच्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चा आयपीएल 2026 मधील प्रवास संपला आहे. श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्स (PBKS) संघालाही या हंगामात आपली कमाल दाखवता आली नाही आणि तेही स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

 

प्ले-ऑफचे संपूर्ण वेळापत्रक 

लीग स्टेजचे सामने संपल्यानंतर आता अंतिम 4 संघ निश्चित झाले असून प्ले-ऑफचा थरार रंगणार आहे. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांनी अव्वल 4 मध्ये जागा मिळवली आहे.

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध गुजरात टायटन्स (GT) – क्वालिफायर-1 (Qualifier 1)
  • सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) – एलिमिनेटर (Eliminator)

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 205 धावा केल्या होत्या. राजस्थानकडून ध्रुव जुरेलने सर्वाधिक 38 धावा (26 चेंडू) केल्या. तर शेवटी जोफ्रा आर्चरने 15 चेंडूंत 32 धावा आणि रवींद्र जडेजाने 11 चेंडूंत नाबाद 19 धावांची आक्रमक खेळी करत संघाला दोनशेपार पोहोचवले. मुंबईकडून दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

प्रत्युत्तर, मुंबईला 20 षटकांत नऊ गडी गमावून फक्त 175 धावाच करता आल्या. मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादवने 42 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 4 षटकारांसह सर्वाधिक 60 धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्याने 34, तर विल जॅक्सने 33 धावा केल्या. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने तीन बळी घेतले, तर नंद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा आणि यशराज पुंजा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. राजस्थानच्या या विजयामुळे पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांचे प्लेऑफमधील प्रवेशाचे दरवाजे बंद झाले आहेत.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशनं क्रिकेटचा इतिहास-भूगोलच बदलला! ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती ते घडलं, ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच त्यांच्याच घरात लोळवलं

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला रामराम, सगळ्या फॉर्मेटमधून निवृत्त, Video Viral

IND vs SL: श्रीलंकाविरुद्धच्या टेस्ट मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

6,6,4,4,4,4..! वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वेला दणका, पुन्हा ठोकलं दणदणीत अर्धशतक

Vaibhav Sooryavanshi: थाला बनला वैभवचा फॅन, ‘वंडर बॉय’ने असा सिक्सर मारला की, स्टेडियममध्ये बसलेला धोनीही अवाक; रिअ‍ॅक्शनचा Video Viral

वैभव सूर्यवंशी नावाच्या वादळाची एन्ट्री! जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर विकेटकीपरच्या डोक्यावरून ‘क्लासिक’ षटकार, पाहा Video