Marathi News Live : महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यासाठी संसदेच्या विशेष अधिवेशनात तीन महत्त्वाची दुरुस्ती विधेयके मांडली जाणार आहेत. या प्रस्तावानुसार 2029 पासून लोकसभा आणि सर्व राज्य विधानसभांमध्ये महिलांना आरक्षण लागू करण्याची तयारी आहे. यामध्ये लोकसभेच्या एकूण जागा वाढवून कमाल 850 करण्याचा प्रस्ताव असून, त्यापैकी 273 जागा महिलांसाठी राखीव असतील. राज्यांसाठी 815 तर केंद्रशासित प्रदेशांसाठी 35 जागा निश्चित करण्याचा विचार आहे. अंतिम जागावाटपासाठी मतदारसंघांची नव्याने रचना केली जाणार असून, आजपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात या विधेयकांवर 18 एप्रिलपर्यंत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे देशभरात उष्णतेची तीव्र लाट वाढत असून अनेक राज्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रासह अनेक भागात हीटवेव्हचा इशारा दिला आहे. त्याचवेळी काही भागात ढगाळ वातावरण व हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उष्णता आणि आर्द्रतेमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-
-
Pune News : ३३ वर्षांचा पेच सुटणार? बाणेर–पाषाण लिंक रोडवर आज निर्णायक बैठक
पुण्यातील बाणेर–पाषाण लिंक रोड प्रकल्पाला अखेर गती मिळण्याची चिन्हे आहेत. तब्बल ३३ वर्षांपासून भूसंपादनातील २०० मीटर अडथळ्यामुळे रखडलेला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आज महापालिकेत महत्त्वाची बैठक होत आहे. टीडीआर व सीमांकनावर निर्णय अपेक्षित असून, त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. -
Nashik News : नाशिक शहर कार्यक्षेत्रात 28 एप्रिलपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ (१) (३) अन्वये नाशिक शहर कार्यक्षेत्रात १४ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्रीपासून ते २८ एप्रिल २०२६ रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदर आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेतील जमावास लागू राहणार नाही. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेले इतर शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच सभा किंवा मिरवणुका काढण्यासाठी रीतसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाही लागू होणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ च्या कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही श्री. कर्णिक यांनी आदेशात नमूद केले आहे. -
Pune News : प्लॅन्ट दाखवण्याच्या बहाण्याने अपहरण; ५० लाखांची खंडणी
पुण्यात मेट्रो प्रकल्पाशी संबंधित व्यावसायिकाचे प्लॅन्ट दाखवण्याच्या बहाण्याने अपहरण करून ५० लाखांची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी त्याला गाडीतून वेगवेगळ्या ठिकाणी नेत मारहाण करत कुटुंबीयांना धमक्या दिल्या. मात्र खराडी पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करून व्यावसायिकाची सुटका केली आणि पाच आरोपींना अटक केली. -
Chhatrapati Sambhajinagar News: हायकोर्ट वकिलाचा संशयास्पद मृत्यू, हत्येची शक्यता
छत्रपती संभाजीनगरमध्ये बीड बायपासवरील गांधेली फाट्याजवळ उच्च न्यायालयाच्या वकिलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. क्लायंटला भेटण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याची शक्यता आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे ठसे मिळवले असून तपास सुरू आहे. -
Chhatrapati Sambhajinagar News : सासऱ्याचा अत्याचार; पतीची साथ, दोघांवर गुन्हा
छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये एका २३ वर्षीय विवाहितेवर सासऱ्याने वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेने पतीकडे तक्रार केल्यानंतर त्याने वडिलांची पाठराखण करत साथ दिल्याचा आरोप आहे. अखेर माहेरी गेल्यानंतर पीडितेने तक्रार दाखल केली. पोलिसांनी सासऱ्याला अटक केली असून पतीविरुद्धही गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू आहे.
बातम्या तुमच्यासाठी
- दुहेरी संकट, घराबाहेर निघणे टाळाच, प्रशासनाचा हाय अलर्ट, पुढील तास धोक्याचे..
-
-
- Sadabhau khot on Rohit Pawar: रोहित पवारांकडून सुनेत्राकाकींचा प्रचार, सदाभाऊ खोतांकडून बोचरी टीका; म्हणाले, ‘पुरोगामीपणाचा खेळ…’
- Horoscope Today 16th April 2026 : गुरूवारचा दिवस खास ठरणार, डोक्यावरचं मोठ्ठ ओझं उतरणार.. आजच्या दिवसात काय काय घडणार? वाचा तुमचं भविष्य
-
Ashok Kharat Case : खरात प्रकरणावर विखे पाटलांचा खुलासा
राधाकृष्ण विखे पाटील यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात आपण अज्ञानातून शिर्डीतील देवस्थानाला भेट दिल्याचे स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते गेले होते, असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात ‘एसआयटी’मार्फत निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच आरोपांबाबत अंजली दमानिया यांनी पुरावे तपास यंत्रणेला द्यावेत, असे आवाहन केले.-
Heatwave And Rain Alert: देशात उष्णतेचा तडाखा, काही भागात पावसाची शक्यता
देशभरात उष्णतेची तीव्र लाट वाढत असून अनेक राज्यांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रासह अनेक भागात हीटवेव्हचा इशारा दिला आहे. त्याचवेळी काही भागात ढगाळ वातावरण व हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उष्णता आणि आर्द्रतेमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-
-
Parliament Special Session : विशेष अधिवेशनात महिला आरक्षणावर चर्चा
महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. पुढील दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याबाबत चर्चा होणार आहे.








