टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Maharashtra Breaking News Today LIVE: संजय राऊत ठाकरे बंधूंची 6 जानेवारीला संयुक्त मुलाखत घेणार

Follow Us:

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 03 January  2026: नवीन वर्षाची सुरुवात राजकीय घडामोडींनी झाली आहे. या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या सर्व ताज्या अपडेट्स आपण या लाइव्ह ब्लॉगमधून पाहणार आहोत.

3 Jan 2026, 11:22 वाजता

मनपा निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंची 6 जानेवारीला मुलाखत

मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत येणार… आता 6 जानेवारीला दणदणीत आणि खणखणीत मुलाखत…खासदार संजय राऊतांची ट्विट करत माहिती…

3 Jan 2026, 10:50 वाजता

मुंबईत भाजपकडून 22 गुजराती-मारवाडी उमेदवार, काँग्रेस-शिवसेना UBTचे तिकीट

मुंबईत भाजपकडून सर्वाधिक 22 गुजराती, मारवाडी उमेदवारांना संधी…काँग्रेसकडून 6 तर शिवसेना UBTकडून एकाला तिकीट..गुजराती-मारवाडी मतदारांचा कौल कुणाला मिळणार याकडे लक्ष…

3 Jan 2026, 10:05 वाजता

संजय राऊत ठाकरे बंधूंची 6 जानेवारीला संयुक्त मुलाखत घेणार

खासदास संजय राऊत ठाकरं बंधूंची एकत्रित मुलाखत घेणार आहेत.. संजय राऊतांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिलीये.. आता दणदणीत.. खणखणीत मुलाखत अशा आशयाचं ट्विट राऊतांनी केलंय.. महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुलाखतीतून सरकारचा समाचार घेतला जाण्याची शक्यता आहे.. येत्या 6 जानेवारीला राऊत ठाकरे बंधूंची ही संयुक्त मुलाखत घेणार आहेत..

 

3 Jan 2026, 09:38 वाजता

नागपुरात पालकांनी 12 वर्षीय मुलाला साखळीत बांधले, गुन्हा नोंद

नागपुरात आई-वडिलांनीच 12 वर्षाच्या मुलाला साखळदंडानं बांधलं… 4 महिने मुलाला अमानुष वागणूक…अजनी पोलीस ठाण्यात पालकांविरोधात गुन्हा दाखल

 

3 Jan 2026, 07:21 वाजता

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांच्या विधानानं चर्चांना उधाण

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवारांचे संकेत, पिंपरीतील पत्रकार परिषदेत अजित पवारांना विचारणा, अजित पवार म्हणाले तुमच्या तोंडात साखर पडो, दादांच्या विधानानं चर्चांना उधाण

3 Jan 2026, 07:10 वाजता

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात महायुतीचं रणशिंग

महायुतीकडून आज मुंबईत महापालिकेच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं जाणार आहे.. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संयुक्त मेळाव्यानं प्रचाराचं नारळ फुटणार आहे.. महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात महायुतीचा मेळावा पार पडणार आहे..मुंबईतील वरळी डोममध्ये संध्याकाळी 6 वाजेदरम्यान शिवसेना भाजपचा संयुक्त मेळावा पार पडणार आहे..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें या मेळाव्याला संबोधित करणार आहेत..प्रचाराची ही पहिलीच सभा असल्याने उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्या युतीबद्दल फडणवीस शिंदे काय बोलतात याकडे लक्ष असेल.

 

3 Jan 2026, 06:52 वाजता

मुंबईत 700 च.फु. घरांना मालमत्ता कर माफी, ज्युनियर ठाकरेंची घोषणा

मुंबईत 700 चौ. फूट घरांना मालमत्ता कर माफ करणार, जाहीरनाम्याआधी ज्युनियर ठाकरेंची मोठी घोषणा, आदित्य, अमित ठाकरेंचं उमेदवारांना मार्गदर्शन

 

3 Jan 2026, 06:51 वाजता

अजित पवारांकडून राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवारांचे संकेत, पिंपरीतील पत्रकार परिषदेत अजित पवारांना विचारणा, अजित पवार म्हणाले तुमच्या तोंडात साखर पडो, दादांच्या विधानानं चर्चांना उधाण

3 Jan 2026, 06:49 वाजता

पुणे महापालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचारावर अजित पवारांचा घणाघात 

 

 

पुणे महापालिकेत लुटारू गँग… भ्रष्टाचारी राक्षसांचं दहन करायचं आहे… मनपातील भाजपच्या भ्रष्ट कारभाराचे अजित पवारांकडून पत्रकार परिषदेत वाभाडे…

 

3 Jan 2026, 06:47 वाजता

पुणे–पिंपरीत प्रचाराचा शुभारंभ

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ, मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत प्रचाराचं रणशिंग फुंकलं जाणार

 

3 Jan 2026, 06:46 वाजता

MPSC मुद्द्यावर जरांगे आक्रमक, सरकारची मुदत संपली

MPSC उमेदवारांबाबत जरांगे आक्रमक… सरकारला दिलेली मुदत संपली… तोडग्यासाठी फडणवीसांना दिलेली 10 वाजेपर्यंतची मुदत…

 

3 Jan 2026, 06:45 वाजता

सोलापुरात भाजपच्या अंतर्गत वादातून मनसे कार्यकर्त्याची हत्या, बाळासाहेब सरवदे यांचा मृत्यू

सोलापुरात भाजपा कार्यकर्त्यांच्या वादात मनसे कार्यकर्त्याची हत्या करण्यात आलीयय. मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रभाग 2 मध्ये अर्ज माघारी घेण्यावरून आज भाजपच्या दोन गटात वाद झाला. प्रभाग 2 मध्ये शालन शिंदे या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत. त्याच्याविरोधात भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रेखा सरवदे यांनी अर्ज माघारी घ्यावं यासाठी शिंदे आणि सरवदे या दोन गटात वाद झाला. या वादात भाजप नेते शंकर शिंदे यांचे कार्यालय देखील फोडण्यात आले. त्याचंवेळी शिंदे परिवाराच्या लोकांनी मध्यस्तीसाठी आलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्यावर जीवघेणा हल्याचा आरोप सरवदे यांच्या नातेवाईकांनी केलाय.

 

3 Jan 2026, 06:44 वाजता

महायुतीकडून मुंबई महापालिका प्रचाराचा बिगुल, फडणवीस–शिंदेंचा संयुक्त मेळावा आज

महायुतीकडून आज मुंबईत महापालिकेच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं जाणार आहे.. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संयुक्त मेळाव्यानं प्रचाराचं नारळ फुटणार आहे.. महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात महायुतीचा मेळावा पार पडणार आहे..मुंबईतील वरळी डोममध्ये संध्याकाळी 6 वाजेदरम्यान शिवसेना भाजपचा संयुक्त मेळावा पार पडणार आहे..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें या मेळाव्याला संबोधित करणार आहेत..

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now