LSG vs RCB : शतकी खेळीनंतर ऋषभ पंतचं खाली डोकं वर पाय

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आयपीएल 2025 स्पर्धेतील शेवटचा सामना सुरु आहे. या सामन्यात ऋषभ पंतने तडाखेबाज फलंदाजी केली. नाबाद शतक ठोकत आरसीबीच्या गोलंदाजांची पिसं काढली. पंतने शतक ठोकल्यानंतर अनोखं सेलीब्रेशन केलं.

आयपीएल 2025 स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात ऋषभ पंतचा झंझावात पाहायला मिळाला. ऋषभ पंतने आक्रमक खेळी करत आरसीबीच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. सात वर्षानंतर ऋषभ पंतने आयपीएलमध्ये शतक ठोकलं आहे. इतकंच काय मेगा लिलावात 27 कोटी मिळूनही हवी तशी कामगिरी या पर्वात झाली नव्हती. वारंवार फेल होत होता. पण या पर्वाच्या शेवटी त्याने शतक ठोकून ऋषभ पंतने जुना अंदाज दाखवला आहे. ऋषभ पंतने 61 चेंडूंचा सामना करत नाबाद 118 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 8 षटकार मारले. चौकार आणि षटकार मारूनच त्याने 92 धावा ठोकल्या. ऋषभ पंतने 193.44 च्या स्ट्राईक रेटने शतक ठोकलं. शतकी खेळींतर ऋषभ पंतचे सेलीब्रेशन चर्चेचा विषय ठरला आहे.

ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. यापूर्वी त्याच्या क्रमवारीवरूनही चर्चा झाली होती. पण शेवटच्या सामन्यात निकलोस पूरनच्या आधी उतरला. यावेळी त्याला खेळण्यासाठी बराच अवधी मिळाला होता. कारण 2.4 षटकातच पहिली विकेट गेली आणि ऋषभ पंत मैदानात उतरला होता. त्याच्यासमोर जवळपास 17 षटकाचा खेळ शिल्लक होता. त्याने संधीचा पुरेपूर फायदा घेतला. 54 चेंडूत शतक पूर्ण केल्यानंतर पंतच्या तोंडावर आनंद स्पष्ट दिसत होता. त्याने शतक झाल्यानंतर लगेच हेल्मेट काढलं. तसेच स्पायडरमनच्या अंदाजात बॅकफ्लिप करत सेलीब्रेशन केलं. पंतचं हे युनिक सेलीब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतच्या शतकी खेळीच्या जोरावर 227 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 3 गडी गमवून 227 धावा केल्या आणि विजयासाठी 228 धावांचं आव्हान दिलं. हा सामना आरसीबीसाठी खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यात पराभव झाला तर टॉप 2 चं स्वप्न भंगणार आहे. तसेच एलिमिनेटर फेरीत मुंबई इंडियन्सचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या सामन्याच्या निकालाकडे लक्ष लागून आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon