टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

लालबागच्या राजाची सोन्याची वीट कितीला विकली?

On: October 1, 2026 3:03 PM
Follow Us:

मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या चरणी यंदा भाविकांनी मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीच्या वस्तू अर्पण केल्या. गणेशोत्सवानंतर या वस्तूंचा लिलाव करण्यात आला. यामध्ये 1 किलो वजनाची 24 कॅरेट सोन्याची वीट तब्बल 1 कोटी 55 लाख रुपयांना विकली गेली.

या सोन्याच्या विटेची मूळ किंमत सुमारे 1 कोटी 48 लाख रुपये होती. याशिवाय 18 कॅरेट सोन्याची 141 ग्रॅम वजनाची गणेशमूर्ती, सोन्या-चांदीचे विविध दागिने, चांदीच्या वस्तू, क्रिकेट बॅट आणि दोन मोटरसायकलींचाही लिलाव करण्यात आला.

लिलावात आतापर्यंत 85 वस्तूंची विक्री झाली असून त्यातून 3 कोटी 22 लाख 28 हजार रुपये जमा झाले आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now