टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

On: June 2, 2026 10:59 AM
Follow Us:

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 80 लाख महिला अपात्र, देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य. निवडणूक संपल्यानंतर अनेक महिला अपात्र ठरु लागल्या आहेत.

CM Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण न करणे, निकषांची पूर्तता न करणे आणि अर्जातील त्रुटी ही यामागील प्रमुख कारणे आहे. अपात्र ठरलेल्या महिलांचे या योजनेंतर्गत मिळणारे 1500 रुपये बंद झाले आहेत. 80 लाख महिला अपात्र ठरल्यानंतर विरोधकांनी महायुती (Mahayuti) सरकारला धारेवर धरलं आहे. याचदरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana)

राज्यातील कुठल्याही पात्र लाडक्या बहिणीला योजनेतून वगळलेलं नाही. डेटाबेसनुसार आणि निकषात  न बसणाऱ्या ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच ज्या लाडक्या बहिणी योजनेच्या निकषात बसत नाही आणि ज्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्या ऐंशी लाख लाडक्या बहिणींना यामध्ये वगळण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

अलीकडे केलेल्या तपासणीत चार ते पाच लाख लाभार्थी असे निघाले ज्यांच्याकडे चार चाकी गाडी आहे. अजूनही काही महिलांना वाटत असेल की, त्या पात्र असून त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. त्यासाठी पुन्हा एकदा केवायसी विंडो ओपन करण्याची सरकारची तयारी असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू केली, तेव्हा या योजनेचे निकष होते. उत्पन्नाचे निकष होते. वयाचे निकष होते, शासकीय नोकरी असेल तर योजनेचा फायदा घेता येणार नाही. चारचाकी गाडी असेल तर योजनेत सहभागी होता येणार नाही, असे अनेक निकष होते, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सुरुवातीला योजना सुरू करताना सेल्फ सर्टिफिकेशन वर योजनेचा लाभ देण्यात आला. तेव्हा पडताळणी केली असती तर त्यात एक ते दीड वर्ष गेला असता. त्यामुळे तेव्हा पडताळणी न करता या योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र, योजनेला देण्यात येणारा पैसा हा जनतेचा पैसा आहे त्यामुळे CAG ऑडिट केलं जातं. त्यांच्याकडून विचारलं जातं की याची पडताळणी तुम्ही केली आहे का? त्यामुळे निकषांची पडताळणी करण्याकरिता सुरुवात करताना केवायसी पडताळणी केली. आठ महिने केवायसी विंडो ओपन ठेवली. यामध्ये ज्या महिला आल्या त्यांना पात्र केले, अशीही माहिती समोर आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

उंचीनुसार किती हवं वजन? डॉक्टरने सांगितलं एकदम सोप्पं गणित

Horoscope Today 2nd June 2026 : घरच्यांशी होऊ शकतं भांडण, आज जीभेवर ठेवा साखर आणि.. या राशीच्या डोक्याला ताप ?

अमेरिकेत मोठी खळबळ! इराणसोबतच्या युद्धादरम्यान धक्कादायक घटना, थेट गोळीबार, तब्बल इतक्या लोकांचा..

Gold Price Today : अमेरिका-इराण तणावादरम्यान मोठी अपडेट, सराफा बाजारात मोठा उलटफेर, 10 ग्रॅम सोन्याची किंमत आता..

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून त्या महिला का झाल्या अपात्र? 7 महत्त्वाची कारणे आली समोर, पाचवं आणि सातवं कारण सर्वात महत्त्वाचं

90 किमी वेगाने वादळ, 17 राज्य धोक्यात, पुढील 8 तास संकटाची, अतिमुसळधार पावसासह..

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now