टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Jay Pawar: जयड्या रडायचं नाही लढायचं; जय पवारांचं भावूक भाषण, अजित दादांची आठवण, बारामतीकरांना ‘लव्ह यु टू’

Jay Pawar: दररोज रात्री आमचे दौरे संपायचे तेव्हा दादांचा मला फोन यायचा, “काय रे जय, कसा दौरा झाला”, असे म्हणणारा आवाज आता नाही, असे म्हणत जय पवार भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.

Jay Pawar: दररोज रात्री आमचे दौरे संपायचे तेव्हा दादांचा मला फोन यायचा, “काय रे जय, कसा दौरा झाला”, असे म्हणणारा आवाज आता नाही. आजही मला तोच आवाज ऐकू येतोय, दादा एकदम ठामपणाने बोलायचे, ‘जयड्या रडायचं नाही, लढायचं’, असे भावनिक भाषण अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र जय पवार (Jay Pawar) यांनी केले. बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठीची सांगता सभा पार पडली. या सभेतून जय पवार बोलत होते.

जय पवार म्हणाले की, शेवटची सांगता सभा झाली तेव्हा अजितदादांच्या समोर भाषण केले होते. सांगता सभेत पहिले भाषण केले. ते त्यांच्यासमोरील शेवटच ठरलं. आता ही निवडणूक आम्ही हातात घेतली आहे. हा प्रचार नाही तर मी माझ्या बारामतीच्या कुटुंबाला भेटत आहे. त्यांच्या अडचणी ऐकून घेत आहे. अजित दादांच्या वेळी प्रचार करायला मला आवडायचं. पाच वर्षांनी प्रचार असायचा. रॅली काढायचो. पण यावेळी मला दादांचा आवाज आठवतोय. दररोज रात्री आमचे दौरे संपायचे तेव्हा दादांचा मला फोन यायचा, “काय रे जय, कसा दौरा झाला”, असे म्हणणारा आवाज आता नाही.

Jay Pawar: अजितदादांनी जातीपातीचे राजकारण कधीही केले नाही

आजही मला तोच आवाज ऐकू येतोय, दादा एकदम ठामपणाने बोलायचे, ‘जयड्या रडायचं नाही, लढायचं”. दादा बारामतीचं सर्वात मोठं कुटुंब सोडून गेलेत. पण, दादा जाता-जाता इतिहास घडवून गेले. पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार राज्याला लाभल्या, असे देखील जय पवार म्हणाले. अजितदादांनी जातीपातीचे राजकारण कधीही केले नाही. अजितदादांचे महाराष्ट्रभर मोठे योगदान होते. दादांनी सर्वांना एकत्रित घेऊन काम केले. ही निवडणूक बिनविरोध झाली असती तर अजितदादांना खरी श्रद्धांजली लाभली असती. पण नियतीमुळे तसं झालं नाही, अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Jay Pawar: बारामतीकर I Love You Too

जय पवार पुढे म्हणाल्या की, अजितदादांचं अपूर्ण स्वप्न करण्यासाठी जिंकण्याचा निर्धार केलाय. 23 तारखेला सुनेत्रा वहिनींना प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे. जसे दादांवर तुम्ही अनेक वर्ष प्रेम केलं, जसं दादांनी तुमच्यावर अनेक वर्ष प्रेम केलं, तसंच प्रेम तुमची सुनेत्रा वहिनींना द्या. आज मी दादांचा उल्लेख बारामतीकरांसाठी करत आहे. बारामतीकर I Love You Too…, असे त्यांनी म्हटले.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

India-China : श्रीलंकेच्या भूमीवर भारताचा मास्टरस्ट्रोक, ड्रॅगनला जशास तसं उत्तर, UAE च्या मदतीने चीनचा मोठा खेळ बिघडवला

Mahesh Shinde On Eknath Shinde: शिवसेनेच्या आमदाराने एकनाथ शिंदेंच्या विरोधातच दंड थोपटलं; म्हणाले, जिल्ह्यात शिवसैनिक आहेत कुठे?

Horoscope Today 20th April 2026 : खास व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी, लग्नाचा प्रस्ताव… वाचा आज तुमच्या राशीत काय ?

Oil Price Surge : आंतरराष्ट्रीय बाजारात मोठा भूकंप, जगात हाहाकार, युद्धात मोठा फटका, थेट तेलाच्या..

IMD Weather Alert : राज्यावर गारपिटीचे संकट, हवामान विभागाचा हाय अलर्ट, तब्बल इतक्या जिल्ह्यात..

Horoscope Today 19th April 2026 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या राशींना होणार मोठा फायदा, तुमची रास आहे का त्यात ?