टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Jai Pawar : राज्यसभेवर जाण्याबाबत जय पवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट, बारामतीत 2029 मध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? ते सुद्धा सांगितलं

On: May 8, 2026 10:20 AM
Follow Us:

Jai Pawar : सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर पुत्र जय पवार यांची वर्णी लागणार अशी चर्चा आहे. त्यावर आता जय पवार स्वत: बोलले आहेत. त्याशिवाय अजितदादांच्या राष्ट्रवादींकडून बारामतीतून 2029 मध्ये उमेदवार कोण असेल? ते सुद्धा केलं स्पष्ट.

Jai Pawar : राज्यसभेवर जाण्याबाबत जय पवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट, बारामतीत 2029 मध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? ते सुद्धा सांगितलं

राजकीय वर्तुळात जय पवार हे राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा होती. पण आता स्वत: जय पवार यांनी यावर खुलासा केला आहे. आपले बंधु पार्थ पवार यांच्याप्रमाणे आपण राज्यसभेवर जाणार नसल्याचं जय पवार यांनी सांगितलं आहे. पण 2029 मध्ये आईला महाराष्ट्राच मुख्यमंत्री बनवण्याचं लक्ष्य असेल हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. जय पवार हे महाराष्ट्राचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र आहेत. त्यांची आई सुनेत्रा पवार या सध्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्यानंतर ते राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा आहे. या बद्दल पत्रकारांनी जय पवार यांना विचारलं. “मला या चर्चांची कल्पना आहे. पण मी राज्यसभेवर जाणार नाही. मी इथेच बारामतीमध्ये सर्वांसाठी काम करेन. बारामतीच्या जनतेला अजित पवार यांना महाराष्ट्राच मुख्यमंत्री झालेलं पहायचं होतं. पण सुनेत्रा पवार 2029 मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा आहे” असं जय पवार बोलले.

“राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, बारामतीची जनता अनेकांना अजित पवार यांना मुख्यमंत्री पदावर पहायचं होतं. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ती इच्छा अपूर्ण राहिली. आता सुनेत्रा पवार मुख्यमंत्री बनून अजितदादांची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करतील अशी राष्ट्रवादीच्या आणि बारामतीच्या जनतेची अपेक्षा आहे. बारामतीतून सुनेत्रा पवार 2029 मध्ये उमेदवार असतील. मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून त्या ही निवडणूक लढतील” असं जय पवार यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी अजून कोणत्या नावांची चर्चा?

सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राज्यसभेवर कोणाला पाठवणार? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. छगन भुजबळ यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे. भुजबळ महाराष्ट्र सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत. ते राज्यसभेवर जाण्याची शक्यता नाही. त्याशिवाय आनंद परांजपे, अविनाश अदिक, विक्रम काकडे यांची राज्यसभेसाठी नावं चर्चेत आहेत. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन खासदार राज्यसभेवर आहेत. प्रफुल पटेल,पार्थ पवार आणि नितीन काका पाटील हे राज्यसभेवर आहेत. प्रफुल पटेल 2024 साली राज्यसभेवर खासदार झाले. त्यांची टर्म 2030 साली संपणार आहे. नितीन काका पाटील यांची राज्यसभेची मुदत 2028 पर्यंत आहे. पार्थ पवार यांच्या राज्यसभेची मुदत 2032 पर्यंत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now