तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही नुकताच नवीन iPhone खरेदी केला असेल तर या 5 मार्गांनी एकदा तपासून पहा. या पद्धतींमुळे तुमचा iPhone बनावट आहे की नाही, हे तुम्ही मिनिटात जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्ही Siri, iPhone Lookup या वेबसाइटचा वापर करू शकता. याविषयी पुढे विस्ताराने जाणून घेऊया.
iPhone सर्वात जास्त आवडला जाणारा स्मार्टफोन बनला आहे. यामागचं कारण म्हणजे या फोनचा दमदार परफॉर्मन्स आणि उत्तम कॅमेरा. लोक हा फोन ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करत आहेत, पण दरम्यान, ऑफलाइन फोन खरेदी करताना iPhone बनावट तर नाही ना, अशी खूप भीती असते. ऑनलाईन अशा फसवणुकीची भीती नेहमीच असते.
तुम्हीही नवीन iPhone खरेदी करत असाल किंवा तुम्ही नुकताच नवीन iPhone खरेदी केला असेल तर तुमचा iPhone बनावट आहे की नाही, हे तुम्ही या 5 प्रकारे काही मिनिटांत शोधू शकता. अशा प्रकारे तुम्ही कोणतीही मोठी फसवणूक टाळू शकता. चला जाणून घेऊया याबद्दल
बनावट iPhone मध्ये सिरी अनेकदा नीट काम करत नाही किंवा त्याचा रिस्पॉन्स खूप वाईट असतो असे निदर्शनास आले आहे. तर रिअल iPhone मध्ये सिरी जबरदस्त पद्धतीने काम करते, जेणेकरून फोनला हात न लावता तुम्ही अनेक गोष्टी करून घेऊ शकता. त्याची चाचणी घेण्यासाठी तुम्ही सिरीला ‘अरे सिरी, आज हवामान कसं आहे?’ अशा गोष्टी विचारून त्याची चाचणी घेऊ शकता. आता जर सिरी प्रतिसाद देत नसेल किंवा या अवस्थेत सक्रिय नसेल तर तुमचा iPhone डुप्लिकेट किंवा बनावट असू शकतो.
iPhone लुकअप वेबसाइटसह पाहा
तुमचा iPhone खरा आहे की बनावट हे तपासण्यासाठी तुम्ही अॅपलच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुमच्या iPhone चा सीरियल नंबर टाकून ही तपासणी करू शकता. यासाठी तुम्हाला गुगलवर जाऊन Check Coverage – Apple लिहावे लागेल आणि पहिल्या वेबसाईटवर जावे लागेल.
इथे Serial Number टाकल्यानंतर वेबसाईटवर Invalid Serial Number असं म्हटलं तर काहीतरी गडबड आहे हे समजून घ्या. फोनचा सीरियल नंबर पाहण्यासाठी तुम्हाला आधी डिव्हाइसच्या Settings, मग General, मग About आणि इथून सीरियल नंबर कॉपी करावा लागेल.
‘हे’ दोन्ही अॅप्सही पाहा
Gyroscope किंवा TrueDepth सारखे कॅमेरा फीचर्स अनेक बनावट iPhone मध्ये मिळत नाहीत किंवा ही फीचर्स फोनमध्ये उपलब्ध नाहीत. अशावेळी अॅप स्टोअरवरून Gyroscope Test किंवा Sensor Test अॅप डाऊनलोड करून तुम्ही जाणून घेऊ शकता.
iPhone बनावट आहे की नाही हे शोधण्यासाठी आपण iPhone संगणकाला कनेक्ट करून देखील तपासू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या फोनला सपोर्ट करण्यासाठी iTunes / Finder वापरू शकता. Finder शी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. आता जर iTunes / Finder मध्ये डिव्हाइस शोधले जात नसेल तर हा फोन डुप्लिकेट देखील असू शकतो कारण खरा iPhone मिनिटात Sync होतो.
Measure अॅपद्वारे चाचणी करा
याशिवाय तुमचा iPhone बनावट नाही हेही तुम्ही Measure अॅपच्या मदतीने जाणून घेऊ शकता. अॅपलचे एआर अॅप फक्त रिअल iPhone वर योग्य प्रकारे काम करते. अशावेळी जर अॅप चालत नसेल किंवा iPhone मध्ये आधीच इन्स्टॉल नसेल तर iPhone बनावट असू शकतो.