टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

IPL 2026, CSK vs GT: गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सला सहज नमवलं, गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप

आयपीएल 2026 स्पर्धेतील 37व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले हते. या सामन्यात सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सला सहज नमवलं.

IPL 2026, CSK vs GT: गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सला सहज नमवलं, गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप

आयपीएल 2026 स्पर्धेतील 37व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा सामना गुजरात टायटन्सशी झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा गुजरात टायटन्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. चेन्नई सुपर किंग्सच्या वाटेला फलंदाजी आली पण काही खास करू शकले नाही. आघाडीचे फलंदाजी झटपट बाद झाल्याने चेन्नई सुपर किंग्स संघावर दडपण वाढलं. त्यामुळे इतर फलंदाजांना सावध खेळण्याची वेळ आली. चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 7 गडी गमवून 158 धावा केल्या आणि विजयासाठी 159 धावांचं आव्हान दिलं. हे सोपं आव्हान गुजरात टायटन्सला गाठणं काही कठीण गेलं नाही. या विजयासाठी गुजरात टायटन्सच्या गुणांमध्ये दोन गुणांची भर पडली आणि थेट सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे आता टॉप 4 मध्ये जागा मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे.

गुजरात टायटन्सचा डाव

आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात गुजरात टायटन्सने विजयासाठी दिलेल्या 159 धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरूवात केली. साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी पावरप्लेमध्ये चांगला खेळ केला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. शुबमन गिल 23 चेंडूत 33 धावा करून बाद झाला. नूर अहमदच्या गोलंदाजीवर फटका मारण्याचा नादात फसला आणि संजू सॅमसनने त्याला स्टम्पिंग केलं. साई सुदर्शनने जोस बटलरसह डाव पुढे नेला. साई सुदर्शनने 33 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.  त्यानंतर त्याने जोस बटलरसह संघाला विजयी पथावर आणून सोडलं. साई सुदर्शनने 46 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकार मारत 87 धावा केल्या. तर जोस बटलर नाबाद 39 आणि वॉशिंग्टन सुंदर नाबाद 1 धावांवर राहिले.

चेन्नई सुपर किंग्सचा डाव

चेन्नई सुपर किंग्सचा डाव पावरप्लेच्या खेळात अडखळला. चेन्नई सुपर किंग्सने पावर प्लेमध्ये फक्त 28 धावा केल्या आणि 3 महत्त्वाच्या विकेट गमावल्या. त्यामुळे संघावर दडपण वाढलं. संजू सॅमसन, उर्विल पटेल आणि सरफराज खान स्वस्तात बाद झाले. त्यानंतर आलेला डेवॉल्ड ब्रेव्हिस हा देखील काही खास करू शकला नाही. संघ अडचणीत असताना कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी सावध फलंदाजी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 43 चेंडूत 59 धावांची भागीदारी केली. पण शिवम दुबे 17 चेंडूत 22 धावा करून बाद झाला. तर कार्तिक शर्माने 9 चेंडूत 15 धावा, जेमी ओव्हरटोनने 6 चेंडूत 18 धावांची खेळी करून बाद झाला. तर कर्णधार ऋतुराज गायकवाड याने शेवटपर्यंत तग धरला. त्याने 60 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकार मारत नाबाद 74 धावा केल्या.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

वैभव सूर्यवंशी याच्यासोबत श्रीलंकेच्या खेळाडूने केले नीच कृत्य, धक्कादायक प्रकार, थेट घरी जा..

Rahmanullah Gurbaz: अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक

Vaibhav Sooryavanshi : श्रीलंकेविरुद्ध जे जमलं नाही ते वैभवने अफगाणिस्तान विरुद्ध करुन दाखवलं, मोठी इनिंग खेळू शकला नाही, पण..

IND vs AFG : केएल-शुबमनचं कडक शतक, टीम इंडियाच्या पहिल्या दिवशी अफगाणिस्तान विरुद्ध 368 धावा

Team India T20I Squads : BCCI कडून आयर्लंड अन् इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; श्रेयस अय्यर कर्णधार, तर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी

Vaibhav Sooryavanshi : हात जोडतो, लांब राहा…; श्रीलंकेत पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीचा पारा चढला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO