पी.एम.किसान व नमो शेतकरी योजने विषयी माहिती

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 पासून केंद्र शासनाने देशभरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही नोव्हेंबर 2023 पासून महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना असून या दोन्ही योजनांचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा.

1.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम. किसान):-

• योजनेचे स्वरुप
पी एम किसान योजना देशभरातील जमीनधारक शेतकऱ्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली या योजनेतंर्गत थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात तीन समान हप्त्यामध्ये प्रति वर्ष 6 हजार रुपये हस्तांतरीत केले जातात.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत लाभ मिळण्यासाठी पात्रता- 
1) कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ देय राहील. (पती, पत्नी किंवा 18 वर्षा खालील मुलास लाभ मिळत असल्यास कुटुंबातील इतर सदस्यास लाभ मिळणार नाही.)
2) लाभार्थ्यांच्या नावे जमीन असणे आवश्यक. (फेरफार फेब्रुवारी 2019 च्या पूर्वीचा असावा), अपवाद मयत शेतकऱ्याकडून वारसा हक्काने जमीनीचे हस्तांतरण झाल्यास लाभ देय)
• अर्ज कोठे करावा- 
            केंद्र शासनाच्या पी एम किसान पोर्टल वर स्वयं नोंदणी करणे.
            सामुहिक सुविधा केंद्र (CSC) मार्फत पोर्टलवर नोंदणी.
• पी एम किसान योजने अंतर्गत नोंदणीकृत लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी खालील आवश्यक बाबी.
           1) भूमि अभिलेखेप्रमाणीकरण (महसूल विभागामार्फत)
           2) आधार प्रमाणीकरण
           3) e-KYC प्रमाणीकरण.

2. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना:-

1. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धरतीवर महाराष्ट्र शासनाने राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नोहेंबर 2023 पासून सुरू केलेली आहे.
2. या योजनेत पात्रतेच्या अटी व शर्ती पी एम किसान योजनेप्रमाणेच असून जे साभाली पी एम किसान योजनेचा
लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळेल.

• योजनेचा लाभ कोणास घेता येणार नाही.

सर्व संस्थात्मक जमीनधारक, घटनात्मक पदांचे माजी आणि वर्तमानधारक जिल्हा परिषदांचे माजी वर्तमान सदस्य, महानगरपालिकांचे माजी आणि विद्यमान महापौर, निवृत्ती वेतनधारक ज्यांचे मासिक पेन्शन 10 हजार रुपये किंवा अधिक आहे. माजी आणि विद्यामान मंत्री राज्यमंत्री लोकसभा/ राज्यसभा / राज्यविधानसभा / राज्यविधान, जिल्हा परिषदेचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष, केंद्र राज्य सरकारची नियमित कर्मचारी, सेवा निवृत्त
(मल्टीटास्किंग स्टाफ खात / गट ड कर्मचारी वगळून) आयकर भरणारे डॉक्टर, अभियंता, वकील, चाटर्ड अकाऊंटंट आणि वास्तुविशारद यांसारखे व्यावसायिक संस्थेमध्ये नोंदणीकृत आहेत आणि सराव करुन व्यवसाय पार पाडतात अशा व्यक्तीना या योजनेत लाभ घेता येणार नाही.
• सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजने अंतर्गत फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे.
    तरी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीएम सन्मान निधी योजना व नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
 जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर
मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon