टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

IND vs PAK T20 World Cup: भारत–पाकिस्तान महामुकाबला आज किती वाजता सुरु होणार? खेळपट्टी ते हवामानाच्या अपडेटपर्यंत, सामन्याची सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Follow Us:

India vs Pakistan T20 World Cup Match: टी-२० विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आज १५ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेत होणार आहे. या सामन्याची वेळ बदलेल का? सामन्याची वेळ, ठिकाण, हवामान आणि खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या.

India vs Pakistan T20 World Cup Match: टी-२० विश्वचषक २०२६ मधील २७वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार असून क्रिकेटप्रेमींना या लढतीची उत्सुकता आहे. भारताने स्पर्धेतील पहिले दोन सामने मुंबई आणि दिल्ली येथे सहज जिंकले आहेत. मात्र आता हा बहुचर्चित सामना श्रीलंकेतील आर प्रेमदासा स्टेडियम (R. Premadasa Stadium) येथे होणार आहे. हवामान आणि वेळेत बदल होणार का, असा प्रश्न चाहत्यांमध्ये उपस्थित होत आहे.

हा सामना आज रविवारी, १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे खेळला जाणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांचा या मैदानावरील हा पहिलाच सामना आहे. भारत आणि श्रीलंकेच्या वेळेत फरक नसल्याने सामना सायंकाळी ७ वाजता सुरू होईल, तर नाणेफेक सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे.

एकूण सामने – १६
भारत विजय – १३
पाकिस्तान विजय – ३

आकडेवारीनुसार भारताचे पारडे जड आहे.

 हवामानाचा अंदाज

कोलंबोमध्ये आज रविवारी दिवसभर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळी पावसाची शक्यता २० ते ३० टक्के असून सायंकाळी ७ वाजता ती सुमारे ४० टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे सामन्यावर पावसाचे सावट आहे. ओव्हरकास्ट वातावरणाचा खेळपट्टीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

 खेळपट्टी अहवाल

आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये उत्तम ड्रेनेज व्यवस्था आहे. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना स्विंगची मदत मिळू शकते. सामना पुढे सरकत असताना खेळपट्टी संथ होत जाईल, ज्यामुळे फलंदाजांसाठी मोठे फटके खेळणे अवघड ठरू शकते. फिरकी गोलंदाजांना विशेष मदत मिळण्याची शक्यता असून पाकिस्तानकडून उस्मान तारिक आणि भारताकडून वरुण चक्रवर्ती यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. हवामान ढगाळ आणि वाऱ्याचा वेग अधिक राहिल्यास चेंडू अधिक हालचाल करू शकतो.

संभाव्य संघरचना

भारत:अ भिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टिरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंह, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती.

पाकिस्तान: सईम अयूब, साहिबजादा फरहान, सलमान आगा (कर्णधार), बाबर आझम, उस्मान खान (यष्टिरक्षक), शादाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहीन आफ्रिदी, उस्मान तारिक, अबरार अहमद.

थेट प्रक्षेपण

भारत–पाकिस्तान सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तसेच जिओहॉटस्टार अ‍ॅप आणि संकेतस्थळावर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशनं क्रिकेटचा इतिहास-भूगोलच बदलला! ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती ते घडलं, ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच त्यांच्याच घरात लोळवलं

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला रामराम, सगळ्या फॉर्मेटमधून निवृत्त, Video Viral

IND vs SL: श्रीलंकाविरुद्धच्या टेस्ट मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

6,6,4,4,4,4..! वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वेला दणका, पुन्हा ठोकलं दणदणीत अर्धशतक

Vaibhav Sooryavanshi: थाला बनला वैभवचा फॅन, ‘वंडर बॉय’ने असा सिक्सर मारला की, स्टेडियममध्ये बसलेला धोनीही अवाक; रिअ‍ॅक्शनचा Video Viral

वैभव सूर्यवंशी नावाच्या वादळाची एन्ट्री! जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर विकेटकीपरच्या डोक्यावरून ‘क्लासिक’ षटकार, पाहा Video