IND vs NZ Champions Trophy 2025 Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना जिंकणाऱ्या टीमला जॅकपॉट लागणार आहे.
IND vs NZ Champions Trophy 2025 Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना आज रविवारी (दि. 09) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लढतीत केवळ ट्रॉफीच नाही तर कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांची रक्कमही पणाला लागणार आहे. यावेळी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या बक्षीस रकमेत तब्बल 53 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या विजेत्या संघाला 2.24 दशलक्ष डॉलर्स (सुमारे २० कोटी रुपये) मिळणार आहेत. तर उपविजेत्या संघावरही पैशांचा पाऊस पडेल. उपविजेत्या संघाला 1.24 दशलक्ष डॉलर्स (9.74 कोटी रुपये) मिळतील. यंदा भारतासमोर एक सुवर्णसंधी आहे. जर भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाला पराभूत केले तर चॅम्पियन्स ट्रॉफी व्यतिरिक्त त्यांना सुमारे 20 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहेत. जर भारत अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून हरला आणि उपविजेता संघ बनला तर भारताला ट्रॉफी गमवावी लागेल आणि 9.74 कोटी रुपयांवर समाधान मानावे लागेल.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेलाही मिळणार बक्षीस
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेलाही समान रक्कम 560,000 (4.87 कोटी रुपये) मिळणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची एकूण बक्षीस रक्कम 60 लाख 90 हजार डॉलर्स (सुमारे ६० कोटी रुपये) आहे. 2017 च्या हंगामाच्या तुलनेत यावेळी बक्षीस रकमेत 53 टक्के वाढ झाली आहे.
पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकाच्या संघांचे नशीब उजळणार
पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर असलेल्या संघाला 3.04 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघांना 1.22 कोटी रुपये मिळतील. याव्यतिरिक्त, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आठही संघांना प्रत्येकी 1.08 कोटी रुपये अतिरिक्त मिळतील. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दर चार वर्षांनी अव्वल आठ संघांमध्ये खेळवली जाते. त्याचवेळी, 2027 मध्ये महिला चॅम्पियन्स ट्रॉफी पहिल्यांदाच टी-20 स्वरूपात खेळवली जाणार आहे.
कोणत्या संघाला किती पैसे मिळणार?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 विजेता संघ – $ 2.24 दशलक्ष (अंदाजे 20 कोटी रुपये)
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 उपविजेता संघ – $ 1.24 दशलक्ष (9.74 कोटी रुपये)
पहिल्या उपांत्य फेरीत पराभूत संघ (ऑस्ट्रेलिया) – $ 560,000 (4.87 कोटी रुपये)
दुसऱ्या उपांत्य फेरीत पराभूत संघ (दक्षिण आफ्रिका) – $ 560,000 (4.87 कोटी रुपये)
इतर महत्त्वाच्या बातम्या
लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट, २ कोटी ५२ लाख महिलांना हप्त्याचे वाटप