Sangola Breaking News; महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, सांगोला तालुक्यातील घडामोडी पाहा एका क्लिकवर, ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडे्स, सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

राजेवाडी तलाव भरल्याने वाहणारे पाणी सांगोला तालुक्यातील शेतीसाठी सोडण्यात यावे: शहाजीबापू पाटील

सांगोला (प्रतिनिधी):- यावर्षी मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाने राज्यात हजेरी लावल्याने उन्हाळ्याची तीव्रता कमी झाली. माण खोर्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने माण नदीला भरपूर प्रमाणात पाणी आल्याने राजेवाडी तलाव भरून तलावातून बाहेर पाणी वाहू लागले आहे. हे वाहणारे पाणी सांगोला तालुक्यातील कॅनॉल,तलाव, बंधारे, ओढे, नाले भरण्यासाठी वापरण्यात यावे. सध्या समाधानकारक पाऊस झाला असला तरी भविष्यात पाऊस लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राजेवाडी तलावातून वाहणारे पाणी तालुक्यातील शेतीसाठी उपयोगात आणणे गरजेचे आहे. भविष्यात त्याचा उपयोग खरीप हंगामातील शेती पिकांना होणार आहे. या मागणीचा विचार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी करून अधिकार्यांना तसे आदेश द्यावेत, अशी मागणी माजी आम शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.
माण खोर्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने माण नदीलाही भरपूर पाणी आले आहे. सध्या राजेवाडी तलाव भरल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. हे वाहून जाणारे पाणी सांगोला तालुक्यातील कॅनॉल, तलाव, नाले, ओढे भरण्यासाठी वापरण्यात यावे, त्यामुळे भविष्यात सध्या पेरणी होत असलेल्या पिकांसाठी त्याचा वापर होईल.
तरी या मागणीचा विचार करून तलावातून वाहून जाणारे पाणी सांगोला तालुक्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावे. सध्या माण नदीतूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. याचा उपयोग तालुक्यातील इतर गावातील तलाव, कॅनॉल, नाले ,ओढे भरण्यासाठी करण्यात यावा.
कोळा येथील डॉ पतंगराव कदम बहुउद्देशीय शिक्षण संस्थेला आदर्श संस्था पुरस्कार प्रदान

सांगोला(प्रतिनिधी):-डॉ पतंगराव कदम बहुद्देशीय शिक्षण संस्था कोळे या संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या दैदीप्यमान कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्यातील एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार कोळे तालुका सांगोला येथील डॉ पतंगराव कदम बहुउद्देशीय शिक्षण संस्था कोळे या संस्थेला कोल्हापूर येथे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शनिवार दिनांक 31 मे 2025 रोजी प्रदान करण्यात आला.
डॉ पतंगराव कदम बहुद्देशीय शिक्षण संस्था संचलित दीपक आबा साळुंखे पाटील सायन्स कॉलेज अँड महाविद्यालय कोळे 11वी, 12 वी विज्ञान (IT विषय), NCC, BA, BSc, BSc(ECS), MSc (Org. Chemistry)38 महाराष्ट्र बटालियन NCC साठी 157 विद्यार्थ्यांना मान्यता. गुरुमुर्ती के एम प्राथमिक विद्यालय व हायस्कूल कोळे अशा विविध शैक्षणिक क्षेत्रामध्ये कौतुकास्पद कार्य असून संस्थेने सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना ज्ञानार्थी बनविण्याचे उत्कृष्ट काम अविरत चालू ठेवले आहे. संस्थेच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेने डॉ पतंगराव कदम बहुद्देशीय शिक्षण संस्था कोळे या संस्थेला राज्यस्तरीय आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार शनिवार दिनांक 31 मे 2025 रोजी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते डॉ.पतंगराव कदम बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित दीपकआबा साळुंखे पाटील सायन्स कॉलेज अँड महाविद्यालय कोळे या संस्थेचे अध्यक्ष श्री.दीपक माने, सचिव श्री.अमोल माने, संचालक श्री.शरद माने, मार्गदर्शक श्री.बाळासाहेब करांडे, सांगोला साखर कारखान्याचे संचालक श्री.राजेंद्र देशमुख, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री.विजय आलदर, उपप्राचार्य गुरव सर, प्रा.हिप्परकर सर, प्रा.कांबळे सर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात एकनाथ स्वाभिमानी सेनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बापूसाहेब अडसूळ, खासदार धैर्यशील माने, खासदार मुन्ना महाडिक, राज्य आरोग्य विभाग प्रमुख मंगेश चिवटे आदींसह अनेक अनेक आजी माजी आमदार खासदार मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेला राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींसह विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन व्यक्त केले.
आदर्श प्राथमिक विद्यालयाचे विविध स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश

सांगोला (प्रतिनिधी):- फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये सांगोला येथील आदर्श प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
इयत्ता 1 ली श्रद्धा संजय लिंगे -ए टी एस 76 गुण मिळवून केंद्रात सहावा क्रमांक पटकावला. इयत्ता दुसरी दुर्गाप्रेरणा पद्मजा खटावकर ए टी एस 138 गुण, गौरी सोमनाथ राऊत ए टी एस 124 गुण, अर्पिता अभिजीत दौंडे ए टी एस 122 गुण, इयत्ता 3 री प्रतिक प्रविण फुले- मंथन 226 गुण, केंद्रात पाचवा, नवाज रहिमान बागवान मंथन 214 गुण, इयत्ता 4 थी अनन्या प्रकाश जाधव- ए टी एस 226 गुण केंद्रात चौदावा क्रमांक पटकावला .
या विद्यार्थ्यांना श्री.सुरवसे सर, श्रीम.केदार मॅडम, कु.कुदळे मॅडम, सौ.राऊत मॅडम या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक दिपक वाघमोडे सर, सचिव लक्ष्मण गवळी सर, संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रभाकर माळी यांनी अभिनंदन केले.
लिंगैक्य कोळेकर महास्वामींचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा कोळे मठात संपन्न

नाझरा (वार्ताहर):- लिंगैक्य रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी तिसावे पिठाधिपती यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त गुरु गादी मठ कोळे ता.सांगोला येथे महास्वामीच्या दर्शनासाठी भक्तगणांचा महापूर दिसत होता. व प्रथम पुण्यस्मरण सोहळ्याचे गुरुमुर्ती निर्वाण रुद्र पशुपती महास्वामीजी 31 पिठाधिपती यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध आयोजन केले होते.
यावेळी धर्मरत्न गुरुलिंग शिवाचार्य महास्वामीजी चिटगुपा व महादेव महाराज प्रमुख उपस्थित होते. सुरुवातीस गुरुवर निष्ठा ठेवा व नामस्मरण करा, आपल्या अनंत अडचणीत गुरु मार्ग काढत असतो यासाठी गुरु महत्त्वाचे आहेत, असे शिवभक्त हनुमंत कोरे महाराज यांनी यावेळी सांगितले.
गुरु हा आपल्या भक्तांना अज्ञानाकडून ज्ञानाकडे व अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा मार्ग दाखवतो तसेच अनेक संकटातून तारणहार करणारा गुरुच असतो म्हणून प्रत्येकाने गुरुच्या उपदेशाचे पालन करा व गुरु शिष्याचे नाते अतूट बनवा असे 31 वे पिठाधिपती रुद्र पशुपती कोळेकर महास्वामिनी आपल्या आशीर्वाचनात सांगितले . तर गुरुची सेवा मनोभावे करा व अनेक वर्षापासून गुरुपरंपरे च्या गादीचा मान आहे, व यासाठी जीवनात जीवमान असेपर्यंत गुरुची सेवा करा असे महादेव महाराज हिंगणगाव यांनी सांगितले.
दुपारी 12 वाजता श्री ची पुष्पवृष्टी संपन्न झाली. त्यानंतर सौ व श्री दीपक तेली यांच्या शुभहस्ते महाआरती संपन्न झाली. तसेच महाप्रसाद वाटप करण्यात आला. महास्वामींचे दर्शन घेण्यासाठी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, युवा नेते यशराजे साळुंखे पाटील यांच्यासह महिला, भक्तगण लाखोंच्या संख्येने उपस्थित होते.
मित्रसंमेलने ही काळाची गरज- प्रा.प्रबुद्धचंद्र झपके
सांगोला विद्यामंदिर एस.एस.सी.74 बॅचच्या तृतीय मित्र संमेलन उत्साहात संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):- उतार वयात ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येणे,संवाद साधणे,हितगुज साधणे गरजेचे असुन लहान पणीची शाळेतील मैत्री अविट असते…गेल्या पन्नास वर्षात एकदाही न भेटलेले तुम्ही मित्र या दोन वर्षात तिसर्यांदा शाळेच्या प्रांगणात भेटत आहात, एकमेकाशी संवाद साधत आहात, ही गौष्ट कौतुकास्पद आहेत,असे मत प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यानी व्यक्त केले.
सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील एस.एस.सी.1974 सालच्या विद्यार्थ्यानी सलग तिसरे मित्रसंमेलन शाळेत आयोजित केले होते. त्या वेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.प्रबुद्धचंद्र झपके बोलत होते..कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्गमैत्रिण वनमाला पैलवान- डोंबे या होत्या..व्यासपीठावर सर्व गुरुजन उपस्थित होते..
कार्यक्रमाची सुरुवात गुरुवर्य कै .बापुसाहेब झपके यांच्या प्रतिमापुजनाने झाली…कार्यक्रमात सर्व वर्गमित्र व मैत्रीणीनी स्वयं परिचय करून दिला..वर्गमित्र व गझल अभ्यासक डॉ.अविनाश सांगोलेकर मित्रसमेलनाचे प्रवर्तक प्रा.राजेंद्र ठोंबरे व कवयत्रि मनिषा ठोंबरे यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला..त्याचप्रमाणे 1 जुन हा सरकारी वाढदिवस असल्याने ज्यांचा वाढदिवस आहे’अशा मित्र व मैत्रीणीना पुस्तक भेट देवुन सन्मानित करण्यात आले.त्याच प्रमाणे सर्व गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन भीमाशंकर पैलवान, ’प्रास्ताविक डॉ.अविनाश सांगोलेकर व आभार प्रदर्शन सुभाष महिमकर यानी केले.. अध्यक्षिय मनोगत वनमाला डोंबे यानी व्यक्त केले.या कार्यक्रमात 50 हून अधिक मित्रमैत्रीणी उपस्थित होते..डौ.हणमंत गावडे यांची पुढील वर्षाचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली..दुसर्या सत्रात विनोद’,गाणी ,गप्पा गोष्टी,शालेय आठवणी यात सगळेजण रंगून गेले होते.
जि प प्रज्ञाशोध परीक्षेत सांगोलकर-गवळीवस्ती शाळेचे तीन विद्यार्थी गुणवत्ताधारक

सांगोला- भविष्यातील एमपीएससी, यूपीएससी व विविध स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी व्हावी यासाठी जि प प्राथमिक शाळा सांगोलकर गवळीवस्ती ( तरंगेवाडी) शाळेत विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. जि प प्रज्ञाशोध परीक्षा, मंथन, केंद्रप्रमुख प्रज्ञाशोध व आयटीएसई परीक्षेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
जि प प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता चौथीमधून 200 पैकी स्वाती खताळ- 168 गुण, ऋतुजा बंडगर- 158 गुण मिळवून गुणवत्ता यादीत आले असून इयत्ता सातवीमधून स्वीटी गावडे हिने 156 गुण मिळवून सांगोला तालुक्यात तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
तसेच सन 2024- 25 मध्ये घेण्यात आलेल्या मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत सुद्धा इयत्ता तिसरीमधून विद्या गावडे – 268 गुण, श्रेयश खताळ- 230 गुण मिळवून गुणवत्ता यादीत आले तर इयत्ता चौथीमधून स्वाती खताळ- 258 गुण, ऋतुजा बंडगर- 234 गुण मिळून गुणवत्ता यादीत आले आहेत. त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता चौथीमधून दोन विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 1000 रुपयाचे बक्षीस, ट्रॉपी व प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार शाळेचे मुख्याध्यापक सुहास कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षक खुशालद्दिन शेख, गणेश व्हनखंडे व अण्णा गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. विविध स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकाचे गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, विस्तार अधिकारी अमोल भंडारी, लक्ष्मीकांत कुमठेकर, केंद्रप्रमुख तानाजी साळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा लतिका गावडे व पालकाकडून कौतुक करण्यात आले
सांगोला विद्यामंदिर पूर्व प्राथमिक विद्यालयांमध्ये वासंतिक वर्ग सुरु

सांगोला (प्रतिनिधी):-सांगोला विद्यामंदिर पूर्व प्राथमिक विद्यालयांमध्ये दिनांक 02/ 06 /2025 वार सोमवार पासून शिशुरंजन, छोटा शिशु व मोठा शिशु या वर्गाचे वासंतिक वर्ग मोठ्या उत्साहात सुरु झाले.
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद लाभला. तसेच पालकांची उपस्थिती ही लाभली. या कार्यक्रम प्रसंगी सांगोला विद्यामंदिर पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु.रोहिणी महारनवर मॅडम व सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. शुभांगी पवार मॅडम तसेच इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका कु.शिल्पा कोळेकर मॅडम यांची उपस्थिती लाभली.
तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. विद्यार्थ्यांना बालचिमुकल्यांना शाळेविषयी प्रेम आवड निर्माण व्हावी यासाठी वासंतिक वर्गाचे आयोजन केले आहे. या वासंतिक वर्गामध्ये मुलांना आपल्या दैनंदिन जीवनातल्या चांगल्या सवयी ,गाणी, गोष्टी, अभ्यास , मनोरंजनात्मक खेळ घेतले जाणार आहेत. सूत्रसंचालन कु. ज्योती मेंढापूरे मॅडम यांनी केले तर आभार कु.बिस्मिल्ला तांबोळी यांनी मानले.
वाणीचिंचाळेे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्साहात साजरी

वाणीचिंचाळे (वार्ताहर):- अहिल्यादेवी होळकर यांनी शेतकरी व जनतेचा विचार करून विहिरी, पानवटे, धर्मशाळा, मंदिरे बांधली. जनतेला प्रामाणिक न्याय देण्याचे कार्य राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केले असल्याचे मत बबन टेकनर यानी सांगितले.
यावेळी सोनगाव ता.फलटणचे माजी सरपंच जयाप्पांना बेलदार व सरपंच जितेंद्र गडहिरे यांच्या हस्ते प्रथमेच पूजन केले. अहिल्यादेवींनी देशभरात हजारो मंदिरे उभा केली. 28 वर्षे दौलतीचा प्रामाणिक कारभार करून उत्तम प्रशासन चालवले. पर्यावरणासाठी शेतकर्यांना 20 झाडे लावली पाहिजे असा नियम करून पुरुषप्रधान संस्कृतीत कर्तुत्ववान स्त्रीचा इतिहास आदर्शवत असल्याचे माजी चेअरमन डी एस निळे याणि सांगितले.
यावेळी अहिल्यादेवी मंडळाचे अध्यक्ष दामोदर सोपे, माजी सरपंच बाबुराव सोपे, माजी उपसरपंच बापूद्दीन शेख, माजी उपसरपंच नामदेव घुणे, बंडू सोपे, नवनाथ येडगे, मंडळाचे उपाध्यक्ष रावसाहेब टेकनर, गुंडा जुजारे, लक्ष्मण पाटील, बाळू बनसोडे, दत्ता सोपे, दयानंद गरंडे, भारत येजगर, शशिकांत निळे, संभाजी निळे, पत्रकार सचिन गायकवाड, सोमेश्वर पाटील अण्णा गरंडे, खांडेकर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
सांगोला महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला महाविद्यालयात शनिवार दि.31 मे 2025 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त्त त्यांच्या प्रतिमेस संस्थेचे सहसेक्रेटरी साहेबराव ढेकळे तसेच माजी प्राचार्य डॉ. मानसिंगराव जगताप, प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून, प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी मराठी विभागप्रमुख डॉ. बबन गायकवाड यांनी आपल्या मनोगतामध्ये अहिल्यादेवी होळकर यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेले कार्य तरूण पिढीला मार्गदशक आहे. त्यांच्या विचाराने आजच्या पिढीने वाटचाल करावी असे मत व्यक्त केले. तसेच “ज्या मनगटात बळ, बुध्दी व चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो” असा महान संदेश अहिल्यादेवीने दिल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन प्रा. डॉ. अमोल पवार, अधिक्षक श्री. पी.एस.शिंदे, श्री.बाबासो इंगोले यांनी केले. यावेळी डॉ.विजयकुमार जाधव, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
राज्यात कोरोनाचे सावट पण घाबरू नका, सतर्क रहा-डॉ.संदीप देवकते

सांगोला (प्रतिनिधी):- राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रसार होत आहे. मात्र नागरिकानी घाबरून न जाता नियमांचे पालन करून, योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जात आहे. देशात केरळ,दिल्ली तसेच राज्यात मुंबई,पुणे येथे कोरोंना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात होणार्या आषाढीवारीच्या अनुषंगाने आरोग्य विभाग सतर्क झाले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप देवकते यांनी दिली.
सद्यस्थितीत तालुक्यामध्ये कोरोनाचा एकही संशयित आढळून आलेला नाही. तरी नागरिकानी खबरदारी घेणे गरजेचे आहे. नागरिकानी पुढाकार घेऊन गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. जर प्रवास करणे अटळ असल्यास कापडी मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुणे सहित वैयक्तीक स्वच्छता राखावी. कोरोना हा संसर्गजन्य आजार असून, श्वसन संस्थेवर परिणाम करणारा आजार आहे, यामुळे सर्दी, खोकला इतर श्वसनाशी संबंधित त्रास असल्यास वैद्यकीय उपचार घ्यावेत. तसेच कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या ठिकाणी प्रवास करणे टाळावे, अशा ठिकाणांहून प्रवास करून आले नंतर वैद्यकीय तपासणी करावी तसेच वैयक्तिक पातळीवर खबरदारी घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप देवकते यांनी केले आहे.
देशात दिनांक 28 मे 2025 पर्यंत कोविड-19 चे एकूण 1621 रुग्ण सक्रिय आहेत. महाराष्ट्र मध्ये सध्या अंदाजे पाचशे सहा रुग्ण सक्रिय असून त्यामधील बहुतांश प्रकरणे मुंबईतील आहेत.सध्या आपल्या शेजारील तालुका माळशिरस मध्ये कोविड चे तीन रुग्ण आढळून आलेले आहेत. हाताची स्वच्छता, श्वसन स्वच्छता, खोकण्याची शिष्टाचार (खोकताना किंवा शिंकताना तोंड किंवा नाक झाकणे) सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे इत्यादी यासारख्या स्वच्छता पूर्ण वर्तनाचे समुदायाने पालन करावे. विशेषत्वाने वृद्ध, सहव्याधी असलेले लोक आणि रोगप्रतिकारक्षमता कमी असलेले या गटातील लोकांनी कमी हवेशीर किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे किंवा अशा ठिकाणी फेस मास्क वापरावा.तीव्र श्वसन आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याचे स्व निरीक्षण ठेवावे आणि जर धाप लागणे, छातीत दुखणे इत्यादी लक्षणे जाणवल्यास जवळच्या आरोग्य केंद्रांना कळवावे, असे आवाहनही डॉ.देवकते यांनी केले आहे.

सांगोला: मोकाट जनावरांमुळे अपघाताच्या घटना वाढल्या; भाविकांच्या कारला धडकली म्हैस
सांगोला : सांगोला शहरातील गर्दीच्या रोडवर मोकाट जनावरे रस्त्यावरच बसून रहदारीला अडथळा होत असल्यामुळे सांगोल्यातील रोडवर अपघाताच्या घटना वाढल्या. नगरपरिषद आरोग्य विभागाकडून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्रस्त वाहनधारकातून होत आहे.
बार्शी येथील संजय साळुंखे कुटुंबासह एका कार मधून वाडी रत्नागिरी जोतिबाच्या देवदर्शनाला गेले होते. देवदर्शन आटोपून शनिवारी सायंकाळी 5 च्या सुमारास सांगोला मार्गे पंढरपूर रोडने जात होते. वीज मंडळाच्या कार्यालयाच्या गेटमधून अचानक म्हैस धावत रोडवर आली अन त्यांच्या कारच्या समोर आली. चालकाने प्रसंगावधान राखून ब्रेक दाबून थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र वेगात असलेली कार त्या म्हशीला धडकून अपघात झाला. अपघातात खाली पडलेली म्हैस उठून निघून गेली, मात्र कारच्या समोरील बाजूचा बोनेट उचकटून चेपटले. डाव्या बाजूची हेडलाइट फुटली तर कारच्या डाव्या बाजूच्या खिडकीच्या काचाही फुटल्या. दरवाजे वाकल्यामुळे मोठे नुकसान झाले.
अचानक धावत येणारी म्हैस भाविकांच्या कारला समोरून धडकली. या अपघातात कारचे समोरील बोनेट उचकटून दरवाज्याच्या काचा फुटून नुकसान झाले. चालकाने प्रसंगावधान राखून कारचा जोरात ब्रेक दाबला अन मोठा अनर्थ टळला. मात्र चालकाच्या उजव्या हाताला मुका मार लागला. ही घटना शनिवारी सायंकाळी 5 च्या सुमारास सांगोला पोलिस स्टेशनजवळ पंढरपूर रोडवर घडली.
सांगोला: कत्तलखानाकडे घेऊन जाणार्या 77 जनावरांची सुटका
सांगोला : कोणत्याही प्रकारे पशू वाहतुकीचा बोर्ड न लावता, पशुवैद्यकीय अधिकार्याचे प्रमाणपत्र नसताना पोलिसांनी सुमारे 77 लहान मोठी जनावरे टेम्पोच्या पाठीमागील हौदात दाटीवाटीने कोंडून कत्तलखानाकडे घेऊन जाताना दोन टेम्पो पकडले. दरम्यान, पकडलेली जनावरांची सुटका करून बाळे येथील गोशाळेत रवाना केली. तर दोन्ही टेम्पो जप्त केले आहेत. ही कारवाई रविवार मध्यरात्री दीडच्या सुमारास अनकढाळ टोल नाका (ता. सांगोला) याठिकाणी केली. याप्रकरणी पोलिसांनी चालक विशाल मोरे (वय 25) व सिद्धार्थ भोसले (वय 22) व प्रशांत जाधव (वय 20 सर्वजण रा. कवठेमहांकाळ जि. सांगली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मिरज ते सोलापूर जाणार्या रोडवरून चारचाकी वाहनातून जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये सोलापूर पोलिस मुख्यालयातील सहायक पोलिस निरीक्षक ठेंगळे, पोलिस कॉन्स्टेबल जेटीधोर, पोलिस कॉन्स्टेबल शेटे, पोलिस कॉन्स्टेबल खुडे, पोलिस कॉन्स्टेबल धनवे व सांगोला पोलिस स्टेशनकडील पोलिस हेड कॉन्स्टेबल अनिल बनसोडे व पोलिस नाईक सुजित जाधव यांनी संयुक्तपणे अनकढाळ टोल नाका येथे सापळा लावला असता सांगोल्याकडून येणार्या दोन चारचाकी वाहनांना संशयावरून हात इशारा करून थांबवले व दोन्ही वाहनावरील चालकांकडे विचारपूस केली असता दोन्ही टेम्पोच्या पाठीमागील हौदामध्ये जर्सी गायीची 37 लहान खोंडे तसेच दुसर्या टेम्पोच्या पाठीमागील हौदात जर्सी गायीची 39 लहान खोडांसह एक जर्सी गाय अशी एकूण 77 जनावरे दाटीवाटीने कोंडून भरल्याचे दिसून आले पोलिसांनी दोन्हीही टेम्पो जनावरांसह ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणून सदरची कारवाई केली.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 863 दाखल्यांचे वाटप
सांगोला : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत महूद (ता. सांगोला) येथे शैक्षणिक दाखले वाटप शिबिरात तहसीलदार संतोष कणसे यांच्या हस्ते विद्यार्थी, नागरिकांना 863 दाखल्यांचे वाटप केले. यावेळी निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे उपस्थित होते.
या शिबिरात महूद मंडलमधील महूद, खवासपूर, लोटेवाडी, इटकी, कटफळ, चिकमहूद, महिम, शिवणे मंडलातील वाकी, शिवणे, गायगव्हाण, खिलारवाडी, एखतपूर, लक्ष्मीनगर, आचकदाणी, सोनलवाडी, बागलवाडी या गावातील विद्यार्थी व नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप केले.
यामध्ये जातीचे दाखले महूद मंडल 61, शिवणे मंडल 12, उत्पन्नाचे दाखले महूद मंडल 449, शिवणे मंडल 184, इडब्ल्यूएस महूद मंडल 8, शिवणे मंडल 5, नॉन क्रिमिलियर महूद मंडल 49, शिवणे मंडल 12, संजय गांधी योजना प्रकरणे महूद व शिवणे प्रत्येकी 3, डोमीसाइल महूद 43, शिवणे 19, अल्पभूधारक प्रमाणपत्र महूद 5, शिवणे 10 असे महूद मंडलमधील सुमारे 618 प्रमाणपत्रे तर शिवणे मंडळातील 245 असे सुमारे 863 प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
यासाठी महूद मंडलचे मंडलाधिकारी प्रशांत जाधव, सुनील जाधव, ज्ञानेश्वर कोळी, कैलास गुशिंगे यांच्यासह महूद व शिवणे मंडल मधील ग्राम महसूल अधिकार्यांनी परिश्रम घेतले.
शिंदे सायन्स क्लासेसचा उद्घाटन सोहळा संपन्न
सांगोला: सांगोला येथे शिंदे सायन्स क्लासेसचे उद्घाटन श्री.आर.पी.भोसले सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. आर पी भोसले व प्रमुख पाहुणे श्री.एस.डी.दुधाळ सर हे होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शिंदे सर यांनी मनोगत व्यक्त करताना शिंदे सायन्स क्लासेस सुरू करण्याचा प्रामाणिक हेतू स्पष्ट करून आधुनिक काळातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण कशाप्रकारे देता येईल या विषयावर आधारित आपले विचार मांडले. तसेच शिंदे सायन्स क्लासेसच्या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांना लेखी एमएचटी-सीईटी, जेईई, नीट या व अशा विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन अत्यंत फी मध्य उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त केला, शिंदे सायन्स क्लासेसचे वैशिष्ट्य म्हणजे मर्यादित विद्यार्थी संख्या असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष देऊन त्यांची परिपूर्ण तयारी करून घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.आर.पी. भोसले सर यांनी आपले विचार मांडताना आधुनिक काळातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात येणार्या अडचणींना सामोरे कसे जावे याचे योग्य मार्गदर्शन केले तसेच उपस्थिती विद्यार्थ्यांना उद्देशून मार्गदर्शन करताना आत्ताच्या काळात क्लासेस चे महत्व विशद केले. क्लासेसच्या माध्यमातून योग्य मार्गाचा अवलंब केल्याने इच्छित देण्यापर्यंत सहजासहजी पोहोचू शकतो याचा देखील उल्लेख केला.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ शिंदे मॅडम यांनी केले कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक उपस्थित होते.
लिगाडे विद्यालयातील गुणवंत पाल्यांचा सत्कार व कौतुक सोहळा संपन्न
सांगोला (प्रतिनिधी):-कै.सरदार शामराव लिगाडे विद्यालय, अकोला (वासूद) मधील एस.एस.सी. 1994 बॅचच्या विद्यार्थ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान सोहळा रविवारी 1 जून रोजी कै. सरदार शामराव लिगाडे विद्यालय, अकोला येथे पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव सर, शिवप्रेमी मंडळ सांगोलाचे अरविंदभाऊ केदार, शाळेचे निवृत्त शिक्षक भगवान केदार सर , बबन मुलाणी सर, लक्ष्मण सावंत गुरुजी, जहांगीर मुलाणी सर, डॉ. अजिंक्य केदार, डॉ. अश्विनी केदार हे मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
मान्यवरांनी मुलांना भविष्याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. एसएससी 1994 बॅचचे दत्तात्रय बजरंग खटकाळे, सुधाकर चंदनशिवे, पांडुरंग शास्त्रे, शहाजिर मुलाणी, दत्ता पाटील, बंडू गुरव, आनंद गुरव, सेनापती केदार, नितीन नकाते, आबासाहेब मुटकुळे, मोहन सावंत, पोपट खटकाळे मेजर, संतोष माने, प्रकाश शिंदे मेजर, रेवणसिद्ध कोकरे, नरेश शिंदे, समाधान शिंदे डेप्युटी, अशोक खटकाळे, विष्णू खटकाळे, युवराज केदार, अरुण गुरव, सौदागर गेजगे, भाउसो केदार, उमेश डबीर, वसंत शिंदे, राजेंद्र शिंदे आदिसह गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक, भाऊ बहिण, आजी आजोबा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.











