टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Gold Price Today : सराफा बाजारातून ग्राहकांसाठी गुड न्यूज ! सोन्याचे भाव दाणकन आपटले… आजचे 10 ग्रॅमचे दर किती ?

Gold Price Today 6 June 2026 Latest News Updates in Marathi : राजधानी दिल्लीसह देशभरातील अनेक शहरांतून सोन्याच्या दराबाबात मोठी अपडेट समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा सोन्याच्या किमतींवर चांगलाच परिणाम झालेला दिसत आहे. आज दिल्ली, मुंबई, चेन्नई सह प्रमुख शहरात सोन्याचे भाव..

Gold Price Today : सराफा बाजारातून ग्राहकांसाठी गुड न्यूज ! सोन्याचे भाव दाणकन आपटले... आजचे 10 ग्रॅमचे दर किती ?
Gold-Silver Price Today on June 6: भारतीय सर्राफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. अमेरिकेतली रोजगाराचे मजबूत आकडे आणि डॉलर मजबूत झाल्यानं जागतिक पातळीवर नफावसूली झाल्यानं मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर काल सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली.
शनिवारी आणि रविवारी आयबीजेए आणि एमसीएक्सकडून दर जाहीर केले जात नाहीत. शुक्रवारी आयबीजेए आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात 1600 ते 1850 रुपयांची घसरण झाली. चांदीच्या दरात देखील काल दिवसभरात 4000 ते 5800 रुपयांची घसरण झाली.
राजधानी नवी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 1 लाख 55 हजार 870 रुपये असून 22 कॅरेट सोन्याचा दर 142890 रुपये इतका आहे. मुंबई आणि कोलकाता येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 55 हजार 720 रुपये असून 22 कॅरेट सोन्याचा दर 142740 रुपये इतका आहे. नवी दिल्ली, मुंबई आणि कोलकाता च्या तुलनेत चेन्नईत सोन्याचे दर अधिक आहेत. चेन्नईतील 24 कॅरेट सोन्याचा दर 157950 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 144290 रुपये इतका आहे.
भारतात चांदीचे सरासरी दर 274900 रुपये किलो ते 279900 रुपयांदरम्यान आहे. नवी दिल्लीत चांदीचा एक किलोचा दर 279900 रुपये असतील. मुंबई आणि कोलकाता येथे चांदीचा एक किलोचा दर 2 लाख 75 हजार रुपये आहे. चेन्नईत एक किलो चांदीचा दर 2 लाख 80 हजार रुपये इतका आहे.
5अमेरिकनं फेड रिझर्व्ह नजीकच्या काळात व्याज दरात कपात करण्याची शक्यता कमी असणं,अमेरिकेतील रोजगारचे मजबूत आकडेवारी या कारणांमुळं गुंतवणूकदार सोन्यातून पैसे काढून घेत आहेत.जागतिक बाजारात सोन्याचे दर 4450 डॉलर प्रति औंस असून चांदीचा दर 73 डॉलर प्रति औंसवर आले आहेत. त्यामुळं भारतात दर घसरले.
हे सुद्धा वाचा
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now