Gajanan Kiritkar on Shiv Sena : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे. विभाजनामुळे फार मोठे नुकसान पक्षाचे झालं आहे. दोन दोन वर्धापन दिवस साजरे होतात, दोन दसरा मिळावे साजरे होताय. ही सगळी दोन ठिकाणची ताकद एकत्र आली तर केवढी मोठी ताकद शिवसेनेची महाराष्ट्रात तयार होईल. आजही वाटतं दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात, त्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेल. असे मोठं विधान शिवसेना शिंदे गटातील नेते आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत काम केलेले ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर (Gajanan Kiritkar) यांनी केलं आहे.
आज माझं बोलणं जर ते ऐकत असतील तर ते मला बोलावून घेतील. मी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी बोलेल. माझ्या वयाचा आणि अनुभवाचा मान ते राखतील असेही ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाकडे पाठ केली, तसं करयला नको होतं- गजानन कीर्तिकर
आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर त्यांना उत्तर द्यावं लागतं, उत्तर दिलं नाही तर जनता संभ्रमात राहते. आज ज्या लाखो शिवसैनिकांमध्येवंदनीय बाळासाहेबांचे विचार भिणले आहे. तो विचार न घेता ठराविक मार्गाने न जाता हिंदुत्वाकडे पाठ केली. हा विचार उद्धव ठाकरेंनी सोडला. ज्या काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जायला नको होतं, त्यांच्य सोबत जायला नको होतं. दरम्यान हाच मुद्दा घेऊन एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उभी केली. त्यांना पक्षाचं चिन्ह मिळालं, शिवसेना नाव मिळालं आणि त्याच आशेने शिवसेना आणि जनता त्यांच्याकडे आली आहे आणि त्यांचं राजकीय भवितव्य घडवण्याची फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. असेही ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. त्याचे पडसाद येत्या महापालिका निवडणुकीत दिसतील. खऱ्या शिवसेनेचा वर्धापनदिन एकनाथ शिंदे यांचा आहे. महाराष्ट्रात भाजपनंतर शिवसेना ही दुसरी सर्वात मोठी राजकीय शक्ती आहे. भगवा विचार हा मुख्य मुद्दा आहे, भगवा विचारपुढे जाणे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार पुढे जाणे. आता अघोरी विद्या नाहीये, ते सिद्ध करणे खूप कठीण आहे, पूर्वी लोकांना तेवढी माहिती नव्हती, तेव्हा लोक म्हणायचे. आता अघोरी विद्या अस्तित्वात नाही. असेही गजानन कीर्तिकर म्हणाले.