खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उद्या मोफत तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया शिबिर

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सांगोल (प्रतिनिधी):- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त, खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सांगोला येथे भव्य मोफत तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन आज मंगळवार दिनांक 22 जुलै 2025 रोजी करण्यात आले आहे.

या शिबिरात विविध आजारांवर मोफत तपासणी, आवश्यक उपचार आणि गरज भासल्यास शस्त्रक्रिया देखील केली जाईल. समाजातील गरीब आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन हॉस्पिटलचे संचालक डॉ. परेश खंडागळे यांनी केले आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon