टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

माजी आमदार दिपकआबांकडून पुन्हा शहाजीबापूवर टीका

Follow Us:

कार्यकर्त्यांना पण काही मिळू द्या ना.. अशी दानत फक्त साळुंखे-पाटील कुटुंबामध्ये- दिपकआबा

 

सांगोला- कोणाला कोठून निवडून आणायचे याबाबत दिपक आबाचा अजूनही नाद कोणी करू नये. सांगोला तालुक्याच्या भविष्याची मला काळजी असून सांगोला तालुक्यातील जनतेला माहित आहे ज्यांच्या सोबत मी असतो त्यांच्यासोबत मीच काय माझे कार्यकर्ते सुद्धा प्रामाणिक पणाने वागत असतात. बापूंनी मला सुद्धा नादाला लावले त्यामध्ये माझे सुद्धा पाच वर्षे वाया गेले आहेत. बापू तुम्ही कोणा कोणाला नादाला लावले हे संपूर्ण सांगोला तालुक्यासह सगळ्या राज्याला माहित आहे तुम्ही तुमच्या पोराला सुद्धा नादाला लावले. पोराला नादाला लावून मतदारसंघ रिझर्वेशन मध्ये टाकला हे पटतं का असा सवाल उपस्थित करून बापू तुमचे खरं पोरावर प्रेम असेल तर त्याला उघडपणाने माझ्या ओटीत टाका, त्याला जवळे गटातून कमळाच्या चिन्हावर निवडून आणतो तुम्ही त्याची काळजी करू नका असा टोला लगावत सगळ्यांना नादाला लावा पण स्वत:च्या लेकाला तर कशाला नादाला लावता असा प्रश्न उपस्थित करुन अंधारात डोळा मारण्याची सवय माझ्यासह माझ्या कार्यकर्त्यांना नसल्याची टीका मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी केली.

मा.आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थित सांगोला येथे मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील गट सांगोला तालुका व शहर कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी मा.आ.शहाजीबापू पाटील यांचा खरपूस समाचार घेत पुढील रणनितीविषयी भाष्य केले.
पुढे बोलताना मा.आ. दिपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले, सत्तेच्या पाठीमागे लागणारा मी नव्हे. मला काय दिलं नाही परमेश्वराने, माझे वडील आमदार होते, मी आमदार झालो, माझी बहीण जिल्हा परिषद अध्यक्ष झाली. माणसाला राजकारणामध्ये किती वेळा काय पाहिजे, सगळे असायलाच पाहिजे असे काय आहे का असा सवाल उपस्थित करुन कार्यकर्त्यांना पण काही मिळू द्या ना अशी दानत फक्त साळुंखे-पाटील कुटुंबामध्ये आहे त्यामुळे माझ्या नादाला जास्त कुणी लागू नये, असे आवाहन करत दिपकआबांची दानत अजून तुम्ही ओळखले नाही मी तुमच्याकडे कधी माझ्यासोबत काम करा म्हणून 40 वर्षात एकदा तरी आलो आहे का, असा सवाल उपस्थित केला.

माझी काळजी करणारेच सांगोला तालुक्यात जास्त जण झाले आहेत. आबा काय करणार, तुम्हाला काय करायचे आहे, माझे मी करायला , ठरवायला माझे मी खंबीर आहे. आबा कोणत्या पक्षात जाणार, जनता हा माझा पक्ष आहे, याचा विचार तुम्ही करू नये, जनता हाच माझा पक्ष असून आजपर्यंत मी अनेक मंडळी सोबत काम केलेले आहे आता तुमच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे असे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांना सांगितले आहे.

येणार्‍या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी आणि आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख आम्ही दोघे मिळून हातात हात घालून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करत पालकमंत्री ना.गोरे सांगतील त्या पद्धतीने सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी माझी दिशा असणार असून जयाभाऊंच्या नेतृत्वाखाली आमदार डॉ.बाबासाहेब यांच्या सहकार्याने येणार्‍या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणनीती आखणार असल्याचेही शेवटी त्यांनी सांगितले.

 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

22 आमदार घेऊन सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल भाजपमधून लढणार; रोहित पवारांच्या दाव्याने राजकारणात खळबळ

मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच

इराण अमेरिका युद्धाबाबत अत्यंत मोठी घोषणा, युद्ध कधी थांबणार थेट सांगितले स्पष्ट

CSK vs LSG IPL 2026 : चेन्नईचा सुपरहिट शो! एका विजयाने पॉइंट्स टेबलचं गणित बदललं, IPL मधून बाहेर होणारा लखनऊ पहिला संघ

कोणी हळदीसाठी जात होतं, तर कोणी लग्नावरुन परतत होतं पण नियतीने…; महाराष्ट्रात रस्ते अपघातांचे भीषण सत्र सुरू

Horoscope Today 8th May 2026 : चिंता सोडा, निवांत रहा.. या राशीला शुक्रवारी मिळेल मोठी ऑफर ! वाचा मेष ते मीनचं भविष्य