टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

न्यूझीलंड-श्रीलंकेसाठी करो या मरो स्थिती, कोण जिंकणार पहिला सामना?

Follow Us:

New Zealand vs Sri Lanka Super 8 T20 World Cup 2026 Live Match Score : श्रीलंकेने सुपर 8 मधील पहिला सामना गमावला आहे. तर पाकिस्तानला सुपर 8 मधील सामना पावसामुळे रद्द झालाय. त्यामुळे दोन्ही संघांची करो या मरो अशी स्थिती आहे.

NZ vs SL Super 8 Live Streaming : न्यूझीलंड-श्रीलंकेसाठी करो या मरो स्थिती, कोण जिंकणार पहिला सामना?

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी 4 पैकी पहिला संघ ठरला आहे. इंग्लंडने सुपर 8 फेरीतील सामन्यात पाकिस्तानवर मात करत सलग दुसरा विजय मिळवला. इंग्लंडने 165 धावांचं आव्हान कॅप्टन हॅरी ब्रूक याच्या चाबूक शतकाच्या जोरावर 2 विकेट्स राखून पूर्ण केलं. इंग्लंडने 19.1 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 166 रन्स केल्या. इंग्लंडने अशाप्रकारे सेमी फायनलमध्ये सलग पाचव्यांदा धडक दिली. तर आता पाकिस्तानचं या पराभवासह जवळपास आव्हान संपुष्टात आलं आहे. आता सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका भिडणार आहेत.

श्रीलंका आणि न्यूझीलंड आमनेसामने

श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांचा सुपर 8 फेरीतील हा दुसरा सामना असणार आहे. न्यूझीलंडचा सुपर 8 फेरीतील पहिला सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. तर श्रीलंकेला सुपर 8 मोहिमेतील आपल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून घरच्या मैदानात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे आता आव्हान काम राखायचं असेल तर श्रीलंका आणि न्यूझीलंड दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे. या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामना कधी?

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामना बुधवारी 25 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामना कुठे?

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामना मोबाईलवर कुठे लाईव्ह पाहता येणार?

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

न्यूझीलंड-श्रीलंकेची करो या मरो स्थिती

इंग्लंड टीमने सुपर 8 मधील आपल्या पहिल्या सामन्यात रविवारी 22 फेब्रुवारीला श्रीलंकेवर 51 धावांनी मात केली होती. श्रीलंकेची अशाप्रकारे सुपर 8 फेरीची सुरुवात पराभवाने झाली. तर न्यूझीलंडसमोर सुपर 8 फेरीतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचं आव्हान होतं. मात्र हा सामना पावसामुळे वाया गेला. त्यामुळे न्यूझीलंडला 1 गुण मिळाला. त्यामुळे आता न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांसाठी बुधवारी होणारा सामना करो या मरो असाच आहे. अशात आता यजमान श्रीलंका विजय मिळवून आव्हान कायम राखणार की न्यूझीलंड सुपर 8मधील पहिला सामना जिंकणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशनं क्रिकेटचा इतिहास-भूगोलच बदलला! ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती ते घडलं, ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच त्यांच्याच घरात लोळवलं

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला रामराम, सगळ्या फॉर्मेटमधून निवृत्त, Video Viral

IND vs SL: श्रीलंकाविरुद्धच्या टेस्ट मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

6,6,4,4,4,4..! वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वेला दणका, पुन्हा ठोकलं दणदणीत अर्धशतक

Vaibhav Sooryavanshi: थाला बनला वैभवचा फॅन, ‘वंडर बॉय’ने असा सिक्सर मारला की, स्टेडियममध्ये बसलेला धोनीही अवाक; रिअ‍ॅक्शनचा Video Viral

वैभव सूर्यवंशी नावाच्या वादळाची एन्ट्री! जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर विकेटकीपरच्या डोक्यावरून ‘क्लासिक’ षटकार, पाहा Video