टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनच्या वतीने आज गुणवंत कामगार पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन

सांगोला (प्रतिनिधी):- सिव्हिल इंजिनियर असोसिएशन सांगोला यांच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील गुणवंत कामगार पुरस्कार वितरण कार्यक्रम आज शनिवार दिनांक 14 जून रोजी दुपारी 3.30 वाजता सांगोला अर्बन बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आ.डॉ.बाबासाहेब देशमुख उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुभाष लऊळकर सर भूषवणार आहेत.

सदर पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सेंट्रींग कारागीर म्हणून श्री.संजय सुखदेव गोडसे, बांधकाम प्लास्टर कारागीर म्हणून श्री.शहाजी जगन्नाथ रणदिवे, नळ कारागीर (प्लंबिंग) म्हणून श्री.संतोष अंकुश केदार, फरशी कारागीर म्हणून श्री.मोहन हिराप्पा गुडदौरु, फॅब्रिकेशन कारागीर म्हणून श्री.नवनाथ आबासाहेब राऊत, इलेक्ट्रिक कारागीर म्हणून श्री.हरीप्रसाद प्रकाश पतंगे, खिडक्या कारागीर म्हणून श्री.किशोर सोपान गाडेकर, सुतार कारागीर (दरवाजे प्लायवूड) कारागीर म्हणून श्री संतोष दत्तात्रय तेली, रंगकाम कारागीर (पेंटर) म्हणून श्री.रमेश तुकाराम गोडसे, सन्मानार्थ (उत्तेजनार्थ) श्री.संभाजी रामचंद्र टाकळे यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

बांधकाम क्षेत्रातील गुणवंत कारागीर पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सिव्हिल इंजिनियर असो.सांगोला यांच्यावतीने करण्यात आले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now