टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

भाजप आमदाराच्या फॉर्च्युनरचा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; चंद्रपाल सिंह लोधी गंभीर जखमी

On: September 26, 2026 9:51 PM
Follow Us:

उत्तर प्रदेशमधून मोठी बातमी समोर आली आहे. बुलंदशहरमधील डिबाई विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार चंद्रपाल सिंह लोधी यांच्या फॉर्च्युनर कारचा गंगा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला. शनिवारी दुपारी पोटा कबूलपूर गावाजवळ हा अपघात झाला.

मुसळधार पावसामुळे एक्स्प्रेस वेवर पाणी साचले होते. या पाण्यामुळे कार स्लीप होऊन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावरील खांबाला जाऊन धडकली. या अपघातात आमदार चंद्रपाल सिंह लोधी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आमदारांसोबत असलेला त्यांचा गनर आणि चालकही जखमी झाले आहेत. अपघातात फॉर्च्युनरच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून टायरही फुटले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now