टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मोठी बातमी : स्वच्छ दिलाने एकत्र यायचं ठरवलं, राज ठाकरेंसोबतच्या युतीवर आदित्य ठाकरेंचं मोठं भाष्य

मुंबई : मुंबई महापालिकेसाठी शिवसेना ठाकरे आणि मनसे एकत्र (MNS Shiv Sena Thackeray Alliance) येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात असताना त्यावर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मोठं भाष्य केलं आहे. महाराष्ट्र हितासाठी जे सोबत येतील आम्ही त्यांच्या सोबत राहू असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीचे संकेत दिले. आमचं राजकारण सेटिंगचं नाही तर स्वच्छ दिलाने एकत्र यायचा विचार आम्ही करत असल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी हे भाष्य केलं.

राज ठाकरेंनी युतीसाठी टाळी दिल्यानंतर त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. पण त्याला बराच वेळ गेला तरी दोन्ही बाजूंकडून काही हालचाली सुरू नव्हत्या. आता या चर्चांना पुन्हा एकदा काहीशी गती मिळण्याची शक्यता आहे. कारण आदित्य ठाकरे यांनी मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

MNS Shiv Sena Thackeray Alliance : महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊ

आदित्य ठाकरे म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी युतीसाठी प्रतिसाद दिला होता. महाराष्ट्र हितासाठी जे कोणी साफ मनाने येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ. साद-प्रतिसाद, टाळी हे चालूच असते. पण आम्ही महाराष्ट्र हिताचं बोलतोय. सेटिंगचं राजकारण करणार नाही, आम्ही स्वच्छ दिलाने पुढे येतोय. जे कोणी सोबत येतील त्यांना सोबत घेऊ. मी कोणत्या एका पक्षाबद्दल बोलत नाही.”

खासदार संजय राऊत यांच्या नरकातले स्वर्ग या पुस्तकावर प्रतिक्रिया विचारल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, “पुस्तकाचे प्रकाशन होऊ द्या, मी पुस्तक वाचले नाही. संजय राऊत यांनी पक्षासाठी तुरुंगवास भोगला. जे तुरुंगात जाण्यास घाबरले, ते सगळे भाजपच्या वॉशिंगमशीन मध्ये गेले. भाजप ने आमचा पक्ष फोडला. ती नीच प्रवृती आहे.”

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

ज्याची भीती वाटत होती, तेच घडले, मॉन्सून धोक्यात, समुद्रमार्गे भारतावर धडकले संकट, लाखो लोक..

Gold Price Today : सोन्याने भरवली धडकी, दर पुन्हा वाढले, आज 10 ग्रॅमसाठी..

रोहित पवाराचं आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी, कोणी पुतना मावशीचे प्रेम दाखवण्याची गरज नाही, जयकुमार गोरेंचा हल्लाबोल

MSRTC NCMC Card : मोठी बातमी, 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक, प्रताप सरनाईक यांची घोषणा

Rohit Pawar: कर्जमाफीसाठी अगोदर 50 हजारांची वसुली? रोहित पवारांचा आरोपांचा नवा बॉम्बगोळा… कर्जमाफीसाठी पंढरपूरमध्ये एल्गार

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; सरकारकडून ३४५ कोटी रुपये वर्ग, मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?