टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मोठी बातमी: शिंदे अन् ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता; राजकारणात एकच खळबळ

Follow Us:

Eknath Shinde and Uddhav Thackeray: कोकणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीत शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत आहे

Eknath Shinde and Uddhav Thackeray: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्ष आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. आता त्याच कोकणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीत शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या एकत्रीकरणासाठी “शहर विकास आघाडी” या नावाने नवीन आघाडी निर्माण करून दोन्ही एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

कणकवली शहरात याबाबत गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीला माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, तसेच स्थानिक नेते सुशांत नाईक, संदेश पारकर, आणि सतीश सावंत हे उपस्थित होते. या बैठकीत नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही एकत्र येण्याची चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

बैठकीत दोन्ही गटातील नेत्यांनी स्थानिक स्तरावर मतभेद विसरून एकत्र येण्याची तयारी दाखवल्याचं सूत्रांकडून समजतं. शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे गट आणि शिंदे गट हे एकत्र येण्याची शक्यता आहे.  शहर विकास आघाडी करून दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता आहे. संदेश पारकर हे कणकवली नगरपंचायतमध्ये शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील. येत्या दोन दिवसात यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नव्या आघाडीच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now