टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मोठी बातमी! लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज, उद्यापासूनच खात्यावर 1500 रुपये; अर्थ खात्यातून 3490 कोटी रुपये वर्ग

Follow Us:

Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) फेब्रुवारीचा हप्ता वेळेच्या आधीच मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीचा हप्ता उद्यापासून द्यायला सुरुवात होणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून (Finance Department) 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.  दरम्यान, यावेळी जानेवारीच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीत लाभार्थींची संख्या घटण्याची शक्यता आहे.

अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता

लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार? असा सवाल उपस्थित केला जात होता. पण आता उद्यापासूनच लाडकी बहिण योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर अखेर 2 कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील ५ लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारीअखेर 2 कोटी 41 लाख लाभार्थी महिला होत्या. मात्र, अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी आलेली नाही. मात्र, त्यातही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

9 लाख महिलांची या योजनेतून नाव कमी करण्यात येणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या 9 लाख होणार आहे. यापूर्वी 5 लाख महिलांची नावं कमी करण्यात आली होती. आता नव्याने 4 लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणा-या 5 लाख महिला आहेत. या महिलांना लाडकी बहिण योजनेतील फक्त 500 रुपये मिळणार तर नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळणार आहेत. दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून त्यांना वगळलं जाणार आहे.वाहनं असलेल्या अडीच लाख महिला आहेत त्यांना ही यातून वगळण्यात आलं आहे. सोबतच निकषात न बसणा-या अनेक महिला आहेत त्यांनी ही पैसे परत करायला सुरुवात केली आहे.

21-65 वयोगटातील महिलांना मिळतात 1500 रुपये

राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabh Election) आधी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात आली होती. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजाराचा लाभ दिला जातो. 21-65 वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. त्यांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होतात.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

सकाळी सकाळी ‘ही’ ड्रिंक करा ट्राय, बद्धकोष्ठता ते पिंपल्सच्या समस्या होतील दूर…

महिंद्राने ग्राहकांना दिला मोठा धक्का ! आता थार रॉक्स खरेदी करणे झाले महाग; जाणून घ्या नवीन किंमत

 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now