मोठी बातमी; कुत्रा आडवा आल्याने कार उलटली; एस टी बसवर आदळून दोन जण ठार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सांगोला – श्वानाला वाचविण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने भरधाव कार विरुद्ध बाजूने येणाऱ्या एसटी बसवर समोरुन जोराची आढळून झालेल्या भीषण अपघातात खाजगी मोजणीकार व त्याच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला तर जखमी एसटी चालकासह वृद्ध प्रवासी महिलेवर सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हा अपघात सोमवार २१ जुलै रोजी सायंकाळी ५:४५ च्या सुमारास सांगोला- मिरज रोडवरील माणनदी पुलाजवळ घडला दरम्यान अपघात इतका भीषण होता की, अपघातात कारचा चक्काचूर झाला असून एसटी बसची समोरील काच, स्टेरिंग तुटून इंजिनचे मोठे नुकसान झाले. याबाबत,याबाबत उल्हास बाबासाहेब धायगुडे रा. बलवडी ता सांगोला यांनी पोलिसात खबर दिली आहे.

राहुल बाबासाहेब ऐवळे -३०, नाझरे ता सांगोला व संदेश लक्ष्मीकांत हेगडे २६ -रा बनपुरी ता आटपाडी जि सांगली असे मृतांची नावे असून, एसटी चालक मुकुंद गोरख पुरी -५० रा तीर्थ बुद्रुक ता. तुळजापूर व पुंजाबाई कारभारी वाघमारे, ७० रा.राजापूर ता दिंडोरी जि नाशिक अशी जखमींची नावे आहेत.

नाझरे ता सांगोला येथील मृत खाजगी मोजणीकार‌ मृत‌ राहुल ऐवळे व त्याच्या मित्र संदेश हेगडे असे दोघे मित्र मिळून सोमवारी सायंकाळी ५:३० च्या सुमारास आटपाडी येथून एम एच-१०-डीव्ही-८०९९ या कारमधून आटपाडी येथून नाझरे मार्गे मिरज कडून सांगोल्याच्या दिशेने येत होते वाटेत त्यांची कार माणनदी पुलावरून पुढे जाताना नेमके कॉर्नरला अचानक कारच्या समोर कुत्रे आडवे आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात राहूलचे भरधाव कार वरील नियंत्रण सुटले. कार दुभाजकाला धडकून तीन – चार वेळा उलटून विरुद्ध बाजूने सांगोल्यांकडून मिरजकडे निघालेल्या एम एच-२० बीएल ४२२६ तुळजापूर – कोल्हापूर एसटी बसवर समोरून जोराची धडकून हा अपघात घडला.

अपघातानंतर रोडवर उलटलेल्या कारमुळे मिरज कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस फौजदार बाबासाहेब भातुंगडे पोलीस कर्मचारी अपघात ग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली तर एसटीचे वाहतूक नियंत्रक सागर कदम व सहाय्यक वाहतूक नियंत्रक पंकज तोंडे यांनी अपघातस्थळी भेट देऊन प्रवाशांना मदत केली.

….मृत राहुल बाबासाहेब ऐवळे -३०, नाझरे ता सांगोला याचे लग्न ३ मार्च २०२४ रोजी झाले होते त्यांना एक महिन्याचा मुलगा आहे त्याच्या पश्चात आई-वडील भाऊ बहीण पत्नी परिवार

…..मृत संदेश लक्ष्मीकांत हेगडे २६ -रा बनपुरी ता आटपाडी जि सांगली १७ ऑगस्ट रोजी विवाह होता त्याच्या पश्चात आई भाऊ असा परिवार आहे. 

 ….एसटी बसेमधील पुंजाबाई कारभारी वाघमारे ७० व निर्मला चिंतामणी वाघमारे -४५ ( रा.राजापूर ता दिंडोरी जि नाशिक ) दोघी सासू-सुन तुळजापूर येथील तुळजाभवानीचे दर्शन घेऊन अपघात ग्रस्त एसटी बस मधून कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी निघाल्या होत्या.

 …. ब्रेक दाबल्याचा जोराने आवाज आल्याने त्या दिशेने लक्ष देण्यापूर्वीच भरधाव कार उलटत एसटीच्या दिशेने येत समोर असल्याचे पाहून जोराचा ब्रेक दाबून एसटी बस जागेवर थांबवली आणि डोळे मिटले त्यावेळी एसटीतील प्रवाशांचा आरडाओरड सुरू होता.

…..मृत राहुल ऐवळे यांचा कारचालक सद्दाम नसीर मुल्ला रा.आटपाडी हा अपघातापूर्वी पत्नीचा दवाखान्यात जाण्यासाठी फोन आल्याने कार मधून आटपाडी- नाझरे रोडवर खाली उतरल्याने दैव बलवत्तर म्हणून वाचला.

 

*वर्षातील सर्वात मोठी ऑफर

*आता खरेदी करा शर्ट पीस,पॅन्ट पीस व मिळवा शिलाई मोफत

*पत्ता – जगताप कॉम्प्लेक्स, कडलास नाका, सांगोला.* *मो.7507940707* 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon