टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Baramati Byelection: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची एंट्री! निवडणूक बिनविरोध होण्याच्या प्रयत्नांना धक्का, ती मोठी अपडेट काय?

Baramati Byelection Congress: बारामती पोटनिवडणुकीसह राहुरी येथील पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. दोन्ही ठिकाणी काँग्रेस उमेदवार देणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्याच्या प्रयत्नांना यामुळे धक्का लागल्याचे मानले जात आहे. काय आहे मोठी अपडेट?

Baramati Byelection: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची एंट्री! निवडणूक बिनविरोध होण्याच्या प्रयत्नांना धक्का, ती मोठी अपडेट काय?

Baramati Byelection Congress: दिवंगत अजितदादांचे विमान अपघातात निधन झाले. बारामतीत पोटनिवडणूक होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी सर्वांचेच मत होते. पण काँग्रेसने निवडणुका आणि सहानुभूती असे दोन्ही वेगळे मुद्दे असल्याचे अधोरेखित केले. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. वंचित आघाडीने अगोदरच काँग्रेसला सहकार्याची भूमिका घेतली आहे. तर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याच्या प्रयत्नांना यामुळे धक्का लागल्याचे मानले जात आहे.

बारामतीसह राहुरी पोटनिवडणूक लढवणार

बारामतीसह राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यास काँग्रेस पक्षाने हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी बिनविरोध निवडणूक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखतीही काँग्रेसने घेतल्याचे समोर आले आहे. दरम्यान उमेदवाराची घोषणा करण्यापूर्वी काँग्रेस मित्रपक्षाशी चर्चा करणार आहे. त्यामुळे ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार की काँग्रेस म्हणून पक्ष निवडणूक लढणार आणि इतर पक्ष तटस्थ भूमिका घेणार हे लवकरच समोर येईल.

बारामती, राहुरी मतदारसंघात काँग्रेसची एंट्री

बारामती आणि राहुरी मतदारसंघात इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. बारामतीमधून 6 उमेदवारांचे अर्ज मिळाले आहेत. तर राहुरी मतदारसंघासाठी काँग्रेसच्या तिकीटावर लढण्यासाठी 4 जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या सर्व उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात आल्या आहेत. दोन्ही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. एक-दोन दिवसात उमेदवाराची घोषणा होईल, असा संदेश आम्ही इच्छुकांना दिला आहे. राष्ट्रवादी जर निवडणूक लढणार नसेल तर काँग्रेस ही निवडणूक लढण्यास तयार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

बारामती आणि राहुरीचा पोटनिवडणूक कार्यक्रम

30 मार्च 2026 रोजी बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

6 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत

7 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी

9 एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत

23 एप्रिल रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान

4 मे रोजी मतमोजणी आणि निकाल

6 मे रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

BJP-Sharad Pawar NCP : भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आले एकत्र, नगरपालिकेत फिरला गेम

शरद पवारांचा पक्ष फूटणार का? आमदार, खासदार…देवेंद्र फडणवीसांनी A टू Z सांगून टाकलं; सस्पेन्स संपला!

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाचे संकेत! जयंत पाटील अन् विनोद तावडे यांची मुंबईत भेट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नवीन चाचपणी?

पुन्हा प्रेम जुळणं कठीण, आम्ही दुसरं लग्न केलं आता…, फडणवीस ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

शिवसेनेची ताकद वाढली; सचिन अहिर यांच्यानंतर आणखी एक आमदार फुटला, शिंदे म्हणाले….

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार? ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया.. पुन्हा महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ?