टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Bala Nandgaonkar: मनसे नेते बाळा नांदगावकरांची शिवसैनिकांनी घेतली भेट; ‘तो’ जल्लोष परत यावा म्हणत घातली साद!

On: June 20, 2025 11:17 AM
Follow Us:

Bala Nandgaonkar: मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा सोलापुरात ठाकरे गटाचे शहर प्रमुख महेश धाराशिवकर आणि उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी सत्कार केला.

Bala Nandgaonkar: सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीबाबत चर्चांना जोर आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि बदलती राजकीय समीकरणं पाहता, ही चर्चा राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मनसेने आतापर्यंत भाजपाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला असला, तरी राज ठाकरे यांचा हिंदुत्वाचा अजेंडा आणि ठाकरे घराण्याचा पारंपरिक मतदार हा काही प्रमाणात समान आहे. यामुळे मनसे व उद्धव ठाकरे गटाची युती झाल्यास मराठी मतांमध्ये एकत्रित ताकद निर्माण होऊ शकते.

बाळा नांदगावकर सोलापुरात आल्यानंतर शिवसैनिकांनी भेट घेत सत्कार केला

या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडूनही संकेत दिले जात आहेत. शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात बोलतानाही त्यांनी याबाबत सुतोवाच केले आहेत. दरम्यान, आज (20 जून) मनसे नेते बाळा नांदगावकर सोलापुरात पोहोचले. देवदर्शनासाठी बाळा नांदगावकर सोलापुरात आल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांची भेट घेत सत्कार केला. यावेळी शिवसैनिकांनी जुना जल्लोष परत आला पाहिजे, असे सांगत युतीसाठी साद घातली. त्यामुळे उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरु असताना स्थानिक पातळीवर देखील कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरु असल्याचे दिसून येत आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा सोलापुरात ठाकरे गटाचे शहर प्रमुख महेश धाराशिवकर आणि उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी सत्कार केला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी छगन भुजबळ यांच्या पराभव केल्यानंतर बाळा नांदगावकर प्रचंड मतांनी निवडून आले, तेव्हा दोन भावांनी (राज-उद्धव) जसा जल्लोष केला होता तो जल्लोष परत यावा ही शिवसैनिक म्हणून विनंती, असल्याचे सांगितले. प्रताप चव्हाण यांच्या विनंतीला बाळा नांदगावकर यांनी केवळ स्मितहास्य करत आणि आभार व्यक्त केलं.

इतर महत्वाच्या बातम्या 

उंची पेग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा, डोळे कोणासाखे माहीत नाहीत, एक कोण तो बाप ठरवा पहिल्यांदा; उद्धव ठाकरेंनी नितेश राणेंची खिल्ली उडवली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now