Assembly Deputy Speaker : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला विधानसभा उपाध्यक्ष पद; अजित पवारांकडून चेहरा सुद्धा ठरला

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Assembly Deputy Speaker : काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी सामाजिक समतोल साधण्यासाठी तसेच एससी प्रवर्गाला न्याय देण्यासाठी उपाध्यक्षपद देणार असल्याची घोषणा केली होती.

Assembly Deputy Speaker : विधानसभा अध्यक्षपद आणि विधानपरिषद अध्यक्षपद भाजपकडे राहिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे विधानसभेचे उपाध्यक्षपद येण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा उपाध्यक्षपदासाठी राजकुमार बडोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी सामाजिक समतोल साधण्यासाठी तसेच एससी प्रवर्गाला न्याय देण्यासाठी उपाध्यक्षपद देणार असल्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर राजकुमार बडोले यांना विधानसभेच्या उपाध्यक्षपदी संधी मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक, राजकीय, प्रादेशिक समतोल पाहता अजित पवार यांच्याकडून बडोले यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या अधिवेशनात तरी विधानसभा विरोधी पक्षनेते पद मिळणार का?

दरम्यान, महाविकास आघाडीकडून विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी कोणाचं नाव दिले जाणार? याची चर्चा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यात आला असून या पदासाठी ज्येष्ठ नेते भास्कर जाधव उत्सुक असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यासाठी महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांचा सुद्धा पाठिंबा लागणार आहे.  ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांचे नाव  विरोधी पक्षनेते पदासाठी आघाडीवर आहे. त्यासोबतच आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांचे नाव सुद्धा चर्चेत आहे.

विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेतेपद देणार?

शिवाय महाविकास आघाडीकडून एकत्रित निर्णय झाला नसल्याचे कळत आहे. पत्र दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष सुद्धा या विरोधी पक्षनेते पद देण्यासंदर्भात सकारात्मक आहेत का? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. शिवाय विधानसभा विरोधी पक्षनेते पद ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळालं तर विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळावं यासाठी काँग्रेस पक्ष दावा करू शकतो. सध्या या पदावर ठाकरेंच्या शिवसेचेने अंबादास दानवे आहेत.

उपांत्य फेरीपूर्वी ऑस्ट्रेलिया संघात नव्या खेळाडूला एन्ट्री, टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

Pune Crime: पोलिसांवर कोयत्याने हल्ला, 2 गोळ्या झाडल्या आणि…

Jitendra Awhad : …म्हणून जितेंद्र आव्हाड आज गुन्हेगारांना घालतात तशा हातात बेड्या घालून आले विधान भवनात

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon