टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

अजित पवार सोमवारी अर्थसंकल्प सादर करणार, शेतकरी, उद्योजक, व्यापाऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे उद्या सोमवार दिनांक 10 मार्च 2025 रोजी राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Maharashtra Budget 2025 : उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे उद्या सोमवार दिनांक 10 मार्च 2025 रोजी राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प (Budget) आहे. अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे. या अर्थसंकल्पाकडे शेतकरी, उद्योजक, व्यापाऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.

अजित पवार हे आर्थिक शिस्तीचे कठोर प्रशासक

अजित पवार हे आर्थिक शिस्तीचे कठोर प्रशासक म्हणून ओळखले जातात. जनमताची नाडी ओळखून अर्थसंकल्पात लोकाभिमुख निर्णय जाहीर करताना राज्याच्या विकासप्रक्रियेला धक्का बसणार नाही याची काळजी ते घेत असतात. विकासयोजनांना निधी उपलब्ध करुन देण्यात तसेच पायाभूत विकासाची प्रक्रिया गतिमान ठेवण्यात ते सातत्याने यशस्वी ठरले आहेत. कोविडच्या संकटकाळात अनेक राज्यांची अर्थव्यवस्था अडचणीत असताना अजित पवार यांनी महाराष्ट्राची आर्थिक शिस्त बिघडू दिली नव्हती, त्याबद्दल त्यांच्या कार्याचा केंद्रीय पातळीवर गौरव झाला आहे.

शेतकरी, कष्टकरी, महिला, दलित, आदिवासी, विद्यार्थी, युवक हे घटक त्यांच्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी

शेतकरी, कष्टकरी, महिला, दलित, आदिवासी, विद्यार्थी, युवक हे घटक त्यांच्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. 2021 चा अर्थसंकल्प 8 मार्च जागतिक महिला दिनी जाहीर करताना त्यांनी तो राज्यातील महिला शक्तीला समर्पित केला होता. 2022 चा अर्थसंकल्प स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीदिनी 11 मार्च रोजी सादर केला होता. तो छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग, समर्पण, स्वराज्यनिष्ठेला समर्पित होता. कृषी, उद्योग, दळणवळण, आरोग्य, मनुष्यबळ विकास या पंचसूत्रीवर आधारीत अर्थसंकल्पही त्यांनी सादर केला आहे. मागील वर्षीचा निवडणूकपूर्व अर्थसंकल्प  सर्वसमावेशक, क्रांतीकारी अर्थसंकल्प होता. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आणण्यात त्या अर्थसंकल्पातील लोकोपयोगी, लोकप्रिय निर्णयांचा महत्वाचा वाटा होता. उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून राज्यातील जनतेला अनेक अपेक्षा असून अजित पवार त्या अपेक्षांवर खरे उतरतील, हा विश्वासही जनतेच्या मनात आहे.

अजित पवार विक्रमाच्या वाटेवर

उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या त्यांचा 11 वा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यानंतर ते शेषराव वानखेडे यांच्यानंतर (13 वेळा) दुसरे सर्वाधिक (11) वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरतील. शेषराव वानखेडे यांनी 13 वेळा, अजित पवार यांनी  उद्याचा अर्थसंकल्प धरून 11 वेळा, त्यांच्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान जयंत पाटील (10 वेळा) आणि  सुशीलकुमार शिंदे (9 वेळा) यांना जातो.

महत्वाच्या बातम्या:

Chhaava Box Office Collection Day 23: शानदार… जबरदस्त… जिंदाबाद! ‘छावा’समोर भलेभले गळपटले; 500 कोटींच्या क्लबमध्ये घेतली थाटत एन्ट्री

लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट, २ कोटी ५२ लाख महिलांना हप्त्याचे वाटप

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

BJP-Sharad Pawar NCP : भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आले एकत्र, नगरपालिकेत फिरला गेम

Farmers Loan Waiver Maharashtra: मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफी लांबणीवर पडली, महायुती सरकारने काय कारण सांगितलं?

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

विधानपरिषदेत बच्चू कडू आक्रमक; मंत्री जयकुमार गोरेंविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव

एक दिवसाचे मुख्यमंत्री बनल्यास काय करणार? तुकाराम मुंडे यांचे बेधडक उत्तर, थेट…

क्षणभर काळीजच हललं… एकमेकांना वाचवताना एकाच कुटुंबातील चौघे चिटकले, शॉक लागून मृत्यू; राज्यात दोन दिवसात 10 जणांचा बळी