टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Ajit Pawar Plane Crash CID Probe: मोठी बातमी: अजितदादांच्या विमान अपघाताभोवती संशयाचं धुकं, दबाव वाढताच व्हीएसआर कंपनीचा मालक चौकशीसाठी सीआयडीच्या कार्यालयात

Ajit Pawar Plane Crash CID Probe: व्हीएसआर कंपनीचा मालक आर.के. सिंग यांची पुण्यातील सीआयडी कार्यालयात चौकशी सुरु झाली आहे. चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येणार?

Ajit Pawar Plane Crash CID Probe: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत गेल्या काही दिवसांमध्ये सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रचंड संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अनेक पत्रकार परिषदा घेऊन अजित पवार यांच्या मृत्यूबाबत व्हीएसआर कंपनी (VSR Company) आणि नागरी उड्डाण संचलनालय (डीजीसीए) काहीतरी माहिती दडवत असल्याचा आरोप केला होता. अजित पवार गटातील अनेक आमदारांनीही रोहित पवारांच्या या भूमिकेची पाठराखण केली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठीचा राज्य सरकारवरील दबाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या अपघाताचा (Ajit Pawar Plane Crash) तपास असलेल्या सीआयडीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीआयडी (CID) पथकाने आता व्हीएसआर कंपनीचा मालक आर.के. सिंग याला चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार आर.के. सिंग (R K Singh) गुरुवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले आहेत. या चौकशीत सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून आर.के. सिंग यांना रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यावर आर.के. सिंग काय स्पष्टीकरण काय देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर आर.के. सिंह यांनी आपल्या कंपनीच्या विमानात कोणताही तांत्रिक बिघाड असल्याचा दावा फेटाळून लावला होता. त्यावेळी एकदाच प्रसारमाध्यमांसमोर आलेल्या आर.के. सिंह यांनी हे प्रकरण तापल्यानंतर नंतर या सगळ्याबाबत चकार शब्दही काढला नव्हता. व्हीएसआर कंपनी आणि केंद्रीय उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांच्यावर रोहित पवार यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. अजित पवार यांच्या विमानाचा वैमानिक ऐनवेळी बदलण्यात आला. या विमानामध्ये गरजेपेक्षा जास्त इंधनाचा साठा करुन ठेवण्यात आला होता. एवढेच नव्हे तर वैमानिक सुमित कपूर याने मुद्दाम विमान जमिनीवर आदळून स्फोट घडवून आणला, असे आरोप रोहित पवार यांनी केले होते. या सगळ्यात व्हीएसआर कंपनीची आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या राममोहन नायडू यांची भूमिका संशयास्पद असल्याचेही रोहित पवार यांनी म्हटले होते. त्यामुळे आज सीआयडीच्या अधिकाऱ्यांसमोर आर.के. सिंग काय जबाब देणार, हे पाहावे लागेल.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now