Air India Plane Crash In Ahmedabad: दोन एअर होस्टेस, काका-काकी जळत होते; मी विमानातून सीटसह बाहेर फेकला गेलो, बचावलेल्या प्रवाशाने थरार सांगितला!

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Air India Plane Crash In Ahmedabad: अहमदाबाद विमान अपघातात एक प्रवाशी बचावला आहे. रमेश विश्वकुमार (40) असे या व्यक्तीचे नाव असून तो 11A या सीट नंबरवर बसला होता.

Air India Plane Crash In Ahmedabad: गुजरातमधील अहमदाबाद येथे काल (12 जून) झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात (Air India Plane Crash In Ahmedabad) 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर अवघ्या 12 ते 15 सेकंदात हा भीषण अपघात झाला.

अहमदाबाद विमान अपघातात एक प्रवाशी बचावला आहे. रमेश विश्वकुमार (40) (Ramesh Vishwaskumar) असे या व्यक्तीचे नाव असून तो 11A या सीट नंबरवर बसला होता. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांची टीम त्याच्यावर सतत लक्ष ठेवून आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देखील रमेश विश्वकुमारची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. रमेश विश्वकुमार या अपघातामध्ये नेमका कसा वाचला, याबाबत विविध चर्चा सुरु आहे. मात्र यादरम्यान स्वत: रमेश विश्वकुमारने महत्वाची माहिती दिली आहे.

 

रमेश विश्वकुमार नेमकं काय म्हणाला?

विमानाचा ज्या भागात माझी सीट होती तो भाग इमारतीच्या खालच्या भागात आदळला असावा. वरच्या भागात आग लागली होती, तिथे बरेच लोक अडकले होते. मी सीटसह खाली पडलो होतो. मी कसा तरी बाहेर पडण्यात यशस्वी झालो. दरवाजा तुटलेला होता आणि जेव्हा मला समोर काही रिकामी जागा दिसली तेव्हा मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला एक भिंत होती, कदाचित तिथून कोणीही बाहेर पडू शकले नाही. रमेश विश्वकुमार म्हणाला की, त्याच्या डोळ्यासमोर दोन एअर होस्टेस, एक काका, काकू आणि सगळं जळत होते. या अपघातात विश्वासचा डावा हात गंभीरपणे भाजला, पण त्याचा जीव वाचला.

अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला-

अपघातग्रस्त विमानाचा महत्त्वपूर्ण ब्लॅक बॉक्स सापडला आहे. फ्लाईट डेटा रेकॉर्डर, कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर सापडला आहे. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमधून अपघाताआधीची महत्त्वपूर्ण माहिती समजणार आहे. फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधून अपघाताआधी माहिती समजणार आहे. दोनपैकी एक ब्लॅकबॉक्स सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे. ब्लॅकबॉक्स सापडल्याने अपघाताच्या कारणांचा उलगडा होणार आहे.

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon