भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला पाहण्यासाठी दुबईच्या रस्त्यांवर तौबा गर्दी

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला पाहण्यासाठी दुबईच्या रस्त्यांवर तौबा गर्दी

दुबई , 27 फेब्रुवारी (हिं.स.)। चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघ सध्या दुबईमध्ये आहे. या स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. याआधी भारताला साखळी फेरीत अखेरचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. न्यूझीलंडच्या सामन्यापर्यंत भारतीय खेळाडूंना दोन दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे.या सुट्टीदरम्यान रोहित शर्मा दुबईच्या रस्त्यांवर दिसून आला.त्यावेळी त्याला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.

भारताचा २३ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध सामना झाला होता. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर न्यूझीलंडच्या सामन्यापर्यंत भारतीय संघाला दोन दिवसाची सुट्टी देण्यात आली.या सुट्टी दरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांच्यासोबत दुबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसून आला. त्यावेळी त्याला पाहून लोकांनी त्याच्या भोवती मोठी गर्दी केली. लोक त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावरून दुबईतही रोहितची मोठी लोकप्रियता असल्याचे दिसून येत आहे. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

रोहित वनडेत चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आला आहे. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्या दोन्ही सामन्यात आक्रमक सुरुवात केली आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात ६ विकेट्सने विजय मिळवला होता.आता भारतीय संघाला न्यूझीलंडला पराभूत करत अ गटात अव्वल स्थान मिळवण्याची संधी आहे. भारत आणि न्यूझीलंड संघात होणाऱ्या सामन्यातून अ गटातील पहिले आणि दुसरे स्थान निश्चित होणार आहे. त्यांच्यातील सामनाही दुबईला होणार आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon