टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोला येथे चोरट्याने केल्या अनोख्या चोरी ; दोन महिलांच्या हातातील पाटल्या कट करुन पळविल्या चोरट्यांने

सांगोला (प्रतिनिधी):-एस टी बस मधुन गर्दीतुन उतरत असताना गर्दीचा फायदा घेवून सव्वा लाख रुपये किंमतीची पावणे तीन तोळे वजनाची सोन्याची पाटली अज्ञात चोरट्यांनी कट करुन पळवून नेली असल्याची घटना सांगोला एस.टी बस स्थानकावर 2 जून रोजी सायंकाळी 5 वाजता घडली. त्याचप्रमाणे दि.03 जून 2025 रोजी एस.टी.बस मध्ये चढत असताना उजवे हातातील दोन तोळे वजनाची सोन्याची पाटली पळवून नेली असून महिलांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून चोरीची फिर्याद भाग्यश्री पाटणे (वय 58 वर्षे, रा.कुंभार गल्ली सांगोला) यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.

दि.02 जून 2025 रोजी भाग्यश्री पाटणे या पती सोबत मंगळवेढा येथे सकाळी 11 वाजणेचे सुमारास गेले होते. त्यानंतर सेवानिवृत्तीचा कार्यक्रम करून सांगोला येथे येण्यासाठी बसमध्ये बसून साधारण सायं. 5 वाचे सुमारास बस स्थानक सांगोला येथे आले होते. त्यावेळी गर्दीतुनच बस मधून उतरून तेथून चालत राहते घरी आले असता उजवे हातातील सोन्याची पाटली नसल्याचे दिसून आले म्हणून चालत आलेले रोडवर व इतर ठिकाणी शोधा शोध केली परंतू ती मिळून आली नाही तेव्हा आमचे निदर्शनास आले की, कोणीतरी अज्ञात चोरट्याने सांगोला एस टी स्टँड येथे बस मधून उतरत असताना गर्दीचा फायदा घेवून उजवे हातातील सोन्याची पाटली ही कशाने तरी कट करुन चोरुन घेवून गेलेले आहेत.

त्याचप्रमाणे सांगोला शहरातील राहणारे सिंधु रामचंद्र भोकरे रा.भारतगल्ली, सांगोला यांचेही दि.03 जून रोजी सकाळी 11.30 वाजणेचे दरम्यान एस टी बस मध्ये चढत असताना उजवे हातातील 2 तोळे वजनाची सोन्याची पाटली कशानेतरी कट करुन चोरी केले असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

आणखी वाचा

Sangola Breaking News; सांगोला शहर व तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर; शुक्रवार दि.6 जून 2025

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now