टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Nashik Vidhan Parishad : नाशिक विधानपरिषदेचा धक्कादायक निकाल, महायुतीचा उमेदवार पडला, गोकुळ गिते विजयी, पहिल्याच फेरीत खेळ संपवला

Nashik Vidhan Parishad Election Result 2026: राज्यभरात कमालीची उत्सुकता निर्माण केलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेर अत्यंत धक्कादायक उलटफेर झाला आहे.

Nashik Vidhan Parishad Election Result 2026: राज्यभरात कमालीची उत्सुकता निर्माण केलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेर अत्यंत धक्कादायक उलटफेर झाला आहे. निवडणुकीतून माघार घेतल्याची केवळ चर्चा असलेल्या आणि भाजपमधून बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवार गोकुळ गीते (Gokul Gite) यांनी महायुतीचे (Mahayuti) अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांचा धुव्वा उडवला आहे. पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक असलेला कोटा पूर्ण करत गोकुळ गीते यांनी नाशिकच्या गडात ऐतिहासिक विजय संपादित केला आहे. या पराभवामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात महायुतीला मोठा धक्का बसला आहे.

Nashik Vidhan Parishad Election Result 2026: गोकुळ गीतेंना 357 मते

या निवडणुकीत एकूण 618 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीदरम्यान यातील 13 मते अवैध ठरवण्यात आली. त्यामुळे एकूण 605 मते वैध ठरली. या वैध मतांच्या आधारे विजयासाठी 303 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता.

एकूण 4 टेबलांवर (4 Tables) पार पडलेल्या या मतमोजणीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी तब्बल 357 मते मिळवत विजयाचा टप्पा सहज पार केला. तर महायुतीचे नरेंद्र दराडे यांना केवळ 248 मते मिळवता आली. दुसऱ्या बाजूला, निवडणुकीच्या रिंगणात असलेले आणखी एक उमेदवार प्रसाद हिरे यांना शून्य मते मिळाली. पहिल्याच फेरीत गोकुळ गीते यांनी 303 चा कोटा पार केल्यामुळे त्यांनी पहिल्याच फेरीत हा खेळ संपवला.

Nashik Vidhan Parishad Election Result 2026: सकाळी झाला होता अभूतपूर्व गोंधळ 

प्रत्यक्ष निकालापूर्वी आज मतमोजणी केंद्रावर कमालीचा तणाव पाहायला मिळाला होता. गोकुळ गीते यांनी मतमोजणी कक्षात पोहोचताच नरेंद्र दराडे यांचे बंधू आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीवर तीव्र आक्षेप घेतला होता. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार कोणत्याही विद्यमान लोकप्रतिनिधीला मतमोजणी कक्षात प्रतिनिधी म्हणून बसता येत नाही, असा मुद्दा मांडत गीतेंनी वकिलांना पाचारण केले होते.

या मुद्द्यावरून मतमोजणी कक्षातच गीते आणि दराडे यांचे समर्थक आमनेसामने आले होते आणि त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती. या गोंधळानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन शंका निरसन केले आणि पोलिसांच्या चोख बंदोबस्तात मतमोजणी प्रक्रिया सुरू ठेवली.

Nashik Vidhan Parishad Election Result 2026: छुप्या मतदानाचा संशय खरा ठरला

महायुतीच्या नेत्यांना पहिल्या दिवसापासून ज्या छुप्या मतदानाचा संशय होता, तो आज निकालातून पूर्णपणे खरा ठरल्याचे दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील संख्याबळानुसार भाजप आणि महायुतीचे पारडे जड असतानाही, बंडखोर गोकुळ गीते यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. ग्रामीण आणि शहरी भागातील महायुतीची मते फुटल्यामुळेच गोकुळ गीते यांचा हा एकतर्फी विजय सुकर झाला. “मी मतदारोंचा उद्रेक पाहिला होता, त्यामुळे मीच जिंकणार,” हा गोकुळ गीतेंचा दावा अखेर निकालाच्या दिवशी खरा ठरला आहे.

आणखी वाचा 

नाशिकमध्ये सगळ्यांना चक्रावून टाकणारा निकाल; विधान परिषदेच्या निवडणुकीतील 17 पैकी 17 विजयी उमेदवारांची यादी

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

कुणाला 5 , तर कुणाला शून्य मते… महाविकास आघाडीचा सर्वात वाईट पराभव; 17 पैकी 17 जागांचा निकाल एका क्लिकवर

परभणीतील यशवाडीत मोठी दुर्घटना: हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला; 7 भाविकांचा मृत्यू, 25 जण गंभीर जखमी; VIDEO

Solapur : अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात ‘वसंत’ बहरेल, धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

तुपकरांच्या आंदोलनाचा मुंबईत भडका, भरसमुद्रात जलसमाधी आंदोलन, मोठा थरार, पोलिसांची दमछाक

Horoscope Today 16th June 2026 : व्यवसाय आणि आर्थिक बाबींमध्ये रहा सावध, मुलांच्या लग्नाची समस्या आज सुटणार, कोणाला मिळणार गुड न्यूज? .. वाचा तुमचं भविष्य !

रोहित पवारांचे कुटुंबीय भावूक; आईने हात जोडले, पंढरपुरात वडिलांचे हाल पाहून मुलांचे डोळे पाणावले