Vidhan Parishad Election Result 2026 Winner Candidate List: विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सध्या मतमोजणी सुरु आहे.

Vidhan Parishad Election Result 2026 Winner Candidate List: विधान परिषद निवडणुकीचा निकाल (Vidhan Parishad Election Result 2026) आज लागणार आहे. सध्या मतमोजणी सुरु आहे. दरम्यान विधान परिषदेच्या 17 पैकी सहा जागांवर महायुतीने मतदानापूर्वीच बिनविरोध विजय मिळवला आहे. त्यामुळे आता 11 जागांसाठी मतमोजणी सुरु आहे. नाशिक, जळगाव, नागपूर, अमरावती, भंडारा-गोंदिया, नांदेड, परभणी-हिंगोली, धाराशिव-लातूर-बीड, छत्रपती संभाजीनगर-जालना, सांगली-सातारा, सोलापूर या जागेचा आज निकाल जाहीर होईल. (Vidhan Parishad Election Result 2026)
स्थानिक संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी एकूण वैध मतांच्या पन्नास टक्के अधिक एक मत, असा ‘विजयाचा कोटा’ निश्चित केला जातो. पहिल्या पसंती क्रमाच्या मतमोजणीत हा कोटा पूर्ण न झाल्यास, दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातात. पहिल्या पसंतीलाच जर कोटा पूर्ण झाला, तर साधारण दुपारी बारा वाजेपर्यंत अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कागदावर मजबूत असणाऱ्या महायुतीसमोर विरोधकांपेक्षाही बंडखोरांनी मोठं आव्हान निर्माण केलं होतं. ही बंडखोरी रोखण्यात महायुतीला यश आलं असलं तरी अंतिम निकालाकडं सर्वांचंच लक्ष असणार आहे. (Vidhan Parishad Election Result 2026)

(जसा निकाल जाहीर होईल, तशी बातमी अपडेट होईल)
विधान परिषदेच्या 17 पैकी 17 जागांचा निकाल- (Vidhan Parishad Election Result 2026 Winner List)
- ठाणे – रवींद्र फाटक – शिवसेना, (बिनविरोध)
- यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी – शिवसेना, (बिनविरोध)
- रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे – राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध)
- पुणे – विक्रम काकडे – राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध)
- वर्धा- गडचिरोली – चंद्रपूर – अरुण लखाणी – भाजप, (बिनविरोध)
- अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे – भाजप, (बिनविरोध)
- छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट- भाजप
- नाशिक- गोकुळ गिते, बंडखोर उमेदवार
- भंडारा- गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर, भाजप
- सांगली- सातारा-धैर्यशील कदम (भाजपा)
- परभणी- हिंगोली- सईद खान, शिवसेना
- सोलापूर- राजेंद्र राऊत, भाजप
- धाराशिव-लातूर- बीड- बसवराज पाटील, भाजप
- नागपूर- राजीव पोतदार, भाजप
- जळगाव- नंदकिशोर महाजन, भाजप
- अमरावती-प्रवीण पोटे (भाजपा)
- नांदेड-अमर राजूरकर (भाजपा)

कुठे किती टक्के मतदान झाले? (Vidhan Parishad Election 2026 Result)
- नाशिक- 100%
- भंडारा – गोंदिया 100%
- सांगली – सातारा 99.89%
- परभणी – हिंगोली 99.78%
- सोलापूर- 99.68%
- धाराशिव – लातूर – बीड 99.49%
- छत्रपती संभाजीनगर – जालना 98.90%
- नागपूर- 98.44%
- जळगाव- 97.78%
- अमरावती- 94.68%












