टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 5 जून 2025 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

  1. राज्यातील 903 विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द, देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, भूसंपादनातील अडचणी, स्थानिकांचा विरोध, कंत्राटदारांनी रखडवलेल्या प्रकल्पांचा समावेश

  2. समृद्धी महामार्ग रेकॉर्डब्रेक वेळेत पूर्ण, आता शक्तीपीठ महामार्गही करु; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार!

  3. अकोला डीपीडीसी बैठकीत मोठा राडा: पालकमंत्र्यांसमोरच भाजप आणि ठाकरेंच्या आमदारांमध्ये बाचाबाची, कार्यकर्तेही आमने-सामने

  4. मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकात भीषण आग: अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, मोठ्या प्रमाणात धूर पसरला

  5. समृद्धी महामार्गात फडणवीस, शिंदेंनी मलिदा खाल्ला: ’50 खोके एकदम OK’ चा कार्यक्रमही त्याच पैशांतून राबवला; श्वेतपत्रिका काढा – काँग्रेस

  6. बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात RCB सह तिघांविरुद्ध FIR: त्यांच्यावर गुन्हेगारी निष्काळजीपणाचा आरोप; HCने मागितला स्थिती अहवाल, 10 जूनला सुनावणी

  7. भाजपचे दरवाजे सर्वांसाठी खुले: सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशावर बावनकुळेंचे विधान; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही भाष्य

  8. राज्यातील 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द: फडणवीस सरकारचा धाडसी निर्णय; योजनांची अंमलबजावणी 3 वर्षांपासून रखडली होती

  9. राज-उद्धव युतीवर आता अमित ठाकरेंचं मोठं भाष्य, म्हणाले, दोघांकडे एकमेकांचा नबंर, फोन करावा

  10. ठाकरे गट-मनसे एकत्र येण्याचा आणखी एक ठोस संकेत, संदीप देशपांडेंच्या हातात राऊतांचं पुस्तक; म्हणाले, ज्यावेळी प्रस्ताव येईल, तेव्हा राजसाहेब निर्णय घेतील

  11. सुधाकर बडगुजरांच्या हकालपट्टीनंतर 24 तासांत उद्धव ठाकरेंचा दुसरा मोठा निर्णय, चार उपनेत्यांच्या नियुक्त्या, नाशिकमध्ये दत्ता गायकवाड यांना दिली ताकद

  12. आमच्याकडे दोन तासांसाठी ईडी, सीबीआय अन् पोलीस आले तर 90 टक्के भाजप आऊटगोईंग करेल ; संजय राऊतांचा हल्लाबोल

  13. नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना तिकीट नाही; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 15 ऑगस्टला होतील महापालिकांच्या निवडणुका

  14. नाशिकमध्ये भीषण अपघात, भरधाव कार थेट बंगल्यात घुसली; पाच जणांचा मृत्यू

  15. बंगळुरू दुर्घटनेवर कोहली म्हणाला- मी पूर्णपणे तुटलो: तेंडुलकर म्हणाले- जे घडले ते दुःखद; पठाणने लिहिले- चेंगराचेंगरी हृदयद्रावक

 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now