टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 4 जून 2026 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, चंद्रपूरसह विधान परिषदेच्या 17 पैकी 8 जागांवर महाविकास आघाडीची माघार, तर महायुतीच्या 5 जागा बिनविरोध, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पॉलिटिकल ड्रामा

  • मान्सून केरलममध्ये पोहोचला, यावर्षी 3 दिवस लेट: 7 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; MP-राजस्थानसह 24 राज्यांत वादळ-पावसाचा अलर्ट

  • कुवेत विमानतळावर इराणी ड्रोन हल्ल्याचा VIDEO: स्फोटाने छताचे तुकडे उडाले, यात 1 भारतीयाचा मृत्यू, 63 जण जखमी झाले होते

  • नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, ठाकरेंचे विधान परिषदेचे उमेदवार बाळ माने भाजपच्या गळाला, बाळ मानेंनी नितेश राणेंसोबत जाऊन अर्ज मागे घेतला

  • ऐनवेळी माघार घेतलेल्याबाळ माने यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी, तर कोट्यवधी रुपये घेऊन बाळ माने मॅनेज झाले, विनायक राऊतांचा गंभीर आरोप

  • NCP मध्ये शिजतंय काय?: दिलीप वळसे-पाटील शरद पवारांच्या भेटीला, सुनेत्रा पवार यांचाही शरद पवारांना फोन

  • विषारी दारू प्रकरणी कारवाईची मागणी: आमदार अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; ती मानवी हत्याच असल्याचा केला आरोप

  • जय पवारांना 10 कोटींचे ‘कर्ज’ नाही तर ‘ॲडव्हान्स’ दिला: बंगला खरेदीसाठी मागील वर्षी केलेला व्यवहार, विक्रम काकडेंचा खुलासा

  • उबाठाने राज्यसभेवर फक्त मोठ्या लोकांना संधी दिली: सामान्य कार्यकर्त्याला काय मिळाले?, पराभव होणार म्हणून वायफळ बडबड सुरू- गिरीश महाजन

  • देशात एकच पक्ष रहावा हा भाजपचा विचार: एकपक्षीय राजकारणाची ही मुहूर्तमेढ, तुम्ही संविधान अन् राष्ट्रप्रेमी नाही हेच यातून सिद्ध होतंय- संजय राऊत

  • उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी तब्बल दीडशे कोटी रुपये खर्च, संजय राऊत यांचे महायुती सरकारवर गंभीर आरोप

  • बारामतीत महागाईविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक; युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन

  • भाजपने सत्तेच्या हव्यासापोटी लोकशाही मुल्ये पायदळी तुडवली, विरोधी पक्षांच्या उमेदवारांना…; काँग्रेसचा आरोप

  • पावसाळ्यापूर्वी सोलापूर मनपा अलर्ट; 74 नाल्यांसह नाला सफाई मोहिमेचा महापौरांनी घेतला आढावा

  • मतदार यादी पुनरिक्षण आणि निवडणूक तयारीसाठी श्रीकांत शिंदे खान्देशात; ‘शिवसंवाद दौऱ्याचा’ चौथा टप्पा

  • शिवसेनेसह भाजपच्या बड्या नेत्यांचे अतोनात प्रयत्न, पण भाजपच्या गोकुळ गीतेंनी शेवटपर्यंत माघार घेतलीच नाही, नाशिकमध्ये शेवटच्या दिवशी हायहोल्टेज ड्रामा, शिवसेनेचे नरेंद्र दराडे विरुद्ध अपक्ष गोकुळ गीते यांच्यामध्ये लढत होणार

  • शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडेंच्या मुलाने आमचा बाप काढला, त्यामुळेच गोकुळ गीतेंनी माघार घेतली नसावी, गणेश गीतेंची माहिती

  • ठाकरे गटाला आधीच कुणकुण, अखेरच्या क्षणी डाव पलटला, छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेच्या अधिकृत उमेदवार देवयानी डोनगावकरांची ऐनवेळी माघार, पण गणेश लोखंडेंच्या अपक्ष अर्जामुळे इज्जत राखली, संख्याबळानुसार भाजपच्या सुहास शिरसाटांचा विजय निश्चित

  • उमेदवारी मागे घ्यावी यासाठी भाजपकडून दबाव, कारखाना समिती बरखास्त करण्याची नोटीस पाठवली, देवयानी डोनगावकरांचे पती कृष्णा डोनगावरकरांचा आरोप

  • सुनील टिंगरेंनंतर शरद पवारांच्या श्रीकांत पाटलांचीही उमेदवारी मागे, राष्ट्रवादीच्या विक्रम काकडेंची पुणे विधान परिषदेवर बिनविरोध निवड

  •   शरद पवार गटाने काँग्रेसचा विश्वासघात केला, श्रीकांत पाटलांच्या माघारीनंतर पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांचा गंभीर आरोप

  • गडचिरोलीतील मायनिंग प्रकल्पाला आमचा विरोध, वन्यजीव संरक्षण नियम मोडून जंगल कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातलं जात आहे, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

  • 7. कार, फ्लॅट अन् सोन्याच्या अंगठीसाठी सुनेचा छळ, पुण्यात 25 वर्षीय नवविवाहितेनं जीवन संपवलं, पतीसह सासू-सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल

  • पैशाच्या व्यवहारावरून वाद, परळीतील तरुणाला मित्रांनीच संपवलं अन् रेल्वे रुळावर फेकलं; 48 तासांमध्ये पोलिसांकडून छडा

  • स्त्री रोगतज्ञ डॉक्टर लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात, 4500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं, रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ

  • ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी पाच हजारांची लाच घेतली,  धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

  • केरळमध्ये मान्सूनचं आगमन, पुढच्या 48 तासांमध्ये कोकण किनारपट्टीवर पावसाची बरसात होण्याची शक्यता, विदर्भात मान्सूनसाठी 15 जून पर्यंत प्रतिक्षा करावी लागणार, हवामान खात्याचा अंदाज

  • दुखापतीमुळे विराट कोहली 13 जून पासून होणाऱ्या अफगाणिस्तान दौऱ्यातून बाहेर, तर रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याला संधी

  • टीम इंडियाला मिळणार नवा टी-20 कर्णधार, श्रेयस अय्यरचं नाव जवळपास निश्चित, तिलक-ईशान उपकर्णधारपदाचे दावेदार

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now