टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 4 जून 2025 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

  1. RCB च्या विजयाच्या जल्लोषात चेंगराचेंगरी, 11 जणांचा मृत्यू: कर्नाटक CM सिद्धरामय्या म्हणाले- स्टेडियमबाहेर 3 लाख लोक पोहोचले, आम्ही तयार नव्हतो

  2. आदित्य ठाकरेंची राज ठाकरेंना एकत्र येण्यासाठी साद: म्हणाले – महाराष्ट्र हितासाठी येत असतील, तर त्यांना सोबत घेऊन लढू

  3. संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान: रिजिजू म्हणाले- ऑपरेशन सिंदूरवर चर्चेस तयार; न्यायमूर्ती वर्मांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव शक्य

  4. अजित पवारांच्याच पक्षात गटबाजी: रोहित पवार यांचा दावा; दादांवर आरोप होत असताना बचावासाठी कुणीही पुढे येत नसल्याकडे बोट

  5. संजय राऊत जातात तिथे ठाकरे गटाचे विघटन: गिरीश महाजन यांचा पलटवार; ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी संपर्कात असल्याचा पुनरुच्चार

  6. देशात 1 मार्च 2027 पासून जातीय जनगणना सुरू होणार, पहिल्या टप्प्यात लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित भारतात जनगणना पार पडणार

  7. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत मोठं नाट्य, पक्षविरोधी काम केल्याने सुधाकर बडगुजर यांचा प्रेस कॉन्फरन्स सुरु असताना हकालपट्टीचा आदेश

  8. सुधाकर बडगुजर यांचे सलिम कुत्तासोबत संबंध, 17 गुन्ह्यांतून सुटण्यासाठी भाजपमध्ये येताहेत, भाजपच्या नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांचा बडगुजरांच्या भाजपप्रवेशाला विरोध

  9. मनसेसोबत युतीवर आपल्याकडून कोणताच प्रॉब्लेम नाही, आता चेंडू राज ठाकरेंच्या कोर्टात, मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

  10. पहिलीपासून फक्त मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा शिकवल्या जातील याचे लेखी आदेश राज्य सरकार कधी काढणार? राज ठाकरे यांचा शिक्षणमंत्री दादा भुसेंना प्रश्न, हिंदीची पुस्तके छापली असतील आणि निर्णय फिरवला तर आंदोलन करण्याचा इशारा

  11. राज्यातील शाळांमध्ये लष्करी प्रशिक्षण देणार, शिक्षणमंत्री दादा भुसेंची घोषणा

  12. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड प्रशासनाचा मोठा निर्णय, मुंबई गोवा महामार्गासह या मार्गांवर अवजड वाहनांना नो एन्ट्री

  13. देशात तब्बल 27 राज्यांमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंटचा शिरकाव; रुग्णांची संख्या साडे चार हजारांकडे, 44 जणांचा मृत्यू

  14. राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 494 वर, नागपुरात दोघांचा मृत्यू

  15. रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून एन्ट्री, आरसीबीसाठी लग्नही पुढे ढकलले; आता किंग कोहलीचे स्वप्न पूर्ण केले, कर्णधार रजत पाटीदारची रंजक कहाणी

 

 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now