टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा ; 17 मे 2025 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

  1. ‘ऑपरेशन सिंदूर’ची यशोगाथा ‘खासदारांची टीम इंडिया’ अवघ्या जगाला सांगणार,पाकिस्तानचा दहशतवादाबाबतचा खरा चेहरा जगासमोर आणणार, शशी थरुर, सुप्रिया सुळे, श्रीकात शिंदेंसह 7 खासदार शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार

  2. ऑपरेशन सिंदूर- भारतीय डेलिगेशनमध्ये थरूर यांच्या नावावरून वाद: काँग्रेसने म्हटले- आम्ही त्यांचे नाव दिले नाही; सरकारने त्यांना एका डेलिगेशनचे लीड बनवले

  3. मुंबई एअरपोर्ट, ताज हॉटेल उडवण्याची धमकी: पोलिसांना मिळाला धमकीचा ईमेल; अफजल गुरूसह सेव्हक्कू शंकरच्या नावाचा उल्लेख

  4. ट्रम्प यांची पुन्हा पलटी, म्हणाले- मी भारत-पाक अणुयुद्ध रोखले: मला त्याचे श्रेय मिळाले नाही; 7 दिवसांत 6 वेळा युद्धबंदीवर विधान केले

  5. उत्तर काश्मिरात अनेक ठिकाणी पोलिसांचे छापे: सांबामध्येही सेनेचे सर्च ऑपरेशन सुरू; पाक PMची कबुली-नूर खान एअरबेसवर हल्ला झाला

  6. शशी थरुर अमेरिकेला भेट देणार, सुप्रिया सुळे दक्षिण आफ्रिका तर श्रीकांत शिंदे यूएईमध्ये भारताची बाजू मांडणार,पाकिस्तानचे खोटे दावे खोडून काढणार

  7. दिल्लीतील आपच्या 15 नगरसेवकांचा राजीनामा: एमसीडीमध्ये वेगळा गट स्थापन करण्याची घोषणा; मुकेश गोयल तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करतील

  8. संजय राऊत खोटारड्या माणसांतील हिरो: संजय शिरसाट यांची टीका; आदित्य ठाकरे यांच्या संभाजीनगर दौऱ्यावरही साधला निशाणा

  9. ईडीच्या अटकेपूर्वी एकनाथ शिंदेंनी मला फोन करुन मी वरती बोलू का?, अमित शाह यांना सांगू का? असं विचारलं, संजय राऊत यांचा पुस्तकात दावा, नरकातील स्वर्ग पुस्तकाचा उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईत प्रकाशन सोहळा

  10. ईडी अधिकाऱ्याने वरती बोलून घेण्याचा सल्ला दिला,आपल्या वरती केवळ बाळासाहेब ठाकरे म्हणत सुनावलं, संजय राऊत यांचा पुस्तकात उल्लेख

  11. हल्ल्याच्या सुरुवातीला पाकिस्तानला माहिती देणं गुन्हा, त्यासाठी परवानगी कुणी दिली? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधी यांचा सरकारला सवाल

  12. भारताने पाकिस्तान नाही, चीनवर सर्वाधिक फोकस करावा;’ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत किंग्ज कॉलेज लंडनमधील आंतरराष्ट्रीय संबंध तज्ज्ञ वॉल्टर लाडविग यांचा सल्ला

  13. पुणे महापालिका निवडणुकीत महायुतीचे पक्ष स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता, अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यात भाजपला अडचण, देवेंद्र फडणवीसांनी 105 नगरसेवकांचं टार्गेट दिलं, शहराध्यक्ष धीरज घाटेंची माहिती

  14. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारेंनी मारहाण केल्याचा भाजप कार्यकर्त्याचा आरोप,जीवे मारण्याची धमकी दिली,पोलीस दखल घेत नसल्याचा मारहाण झालेल्या भाजप कार्यकर्ता कैलास पवारचा दावा

  15. पुणे आयसिस मोड्यूल प्रकरणी दोघांना अटक;दोन वर्षांपासून फरार असलेल्या दोघांना इंडोनेशियातून अटक,राष्ट्रीय तपास यंत्रणेची मोठी कारवाई

  16. युट्युबर ज्योती मल्होत्राच्या मुसक्या आवळल्या; पाकिस्तानी गुप्तचर एजंटांशी संपर्क ठेवत संवेदनशील माहिती शेअर केल्याचा आरोप

  17. आजपासून पुन्हा आयपीएलचा थरार रंगणार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने सामने,अजिंक्य रहाणेच्या टीमला विजय आवश्यक, मॅचवर पावसाचं सावट

  18. रोस्टन चेज वेस्ट इंडिजचा नवा कसोटी कर्णधार: दोन वर्षांनी संघात परतणार, ब्रेथवेटची जागा घेईल; ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 कसोटी सामन्यांची मालिका

  19. कोहलीसाठी 18 नंबरच्या पांढऱ्या जर्सीत आले चाहते

  20. तेंडुलकर-गावस्कर यांच्यानंतर वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माचे स्टँड: पालकांनी केले उद्घाटन, भारतीय कर्णधार म्हणाला- स्वप्नातही याचा विचार केला नव्हता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा