टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले अनंतात विलीन, साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप

स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन झाल्या आहेत. मुंबईतील शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज आणि प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.

स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले अनंतात विलीन, साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप

Asha Bhosle Passes Away : ज्येष्ठ गायिका स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन झाल्या आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार आशिष शेलार, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री संजय शिरसाट, मुंबईच्या महापौर रितू तावडे,  तसेच राजकीय, सामाजिक, सिनेजगतातील दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या. आशा भोसले आज आपल्यात नसल्या तरी त्यांनी गायलेल्या हजारो गाण्यांच्या रुपात त्या कायम आपल्यातच राहतील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

शाककीय इतमामात अंत्यसंस्कार

आशा भोसले यांचे 12 एप्रिल रोजी दु:खद निधन झाले. हे वृत्त समोर येताच सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. आज शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी लोअर परळ येथील निवासस्थानी आशाताईंचे पार्थित अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर अंत्ययात्रेदरम्यान हजारो लोकांनी आशाताईंचे अखेरचे दर्शन घेतले. शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर राजकीय नेत्यांनी आशाताईंना पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या वर्षी अनेक जाहीर कार्यक्रमांना उपस्थिती

त्यांना अलौकिक स्वरांची देणगी लाभली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 12 हजारांपेक्षा जास्त गाणी गायली. मराठी, हिंदी, बंगाली अशा वेगवेगळ्या भाषांत त्यांनी गाणी गायली. आशाताई गेल्या वर्षीच अनेक जाहीर कार्यक्रमांना उपस्थित होत्या. वयाची नव्वदी पार करूनही खणखणीत आणि मधूर आवाजाने त्यांनी अनेक कार्यक्रमांत गाणी गायली. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होत्या. शनिवारी संध्याकाळी 7 वाजता त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचाराला साथ न दिल्याने आशाताईंचे निधन झाले. आशाताई आता या जगात नसल्याने सीनेजगताचे तसेच महाराष्ट्राची कधीही न भरून निघणारी हानी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात; घोंगडी सभा घेऊन बारामती पिंजून काढली

Loksabha : लोकसभेतील खासदार 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर

तिला व्हायचं होतं पोलीस, पण फक्त 2 मार्क…20 वर्षीय तरुणीने उचचलं टोकाचं पाऊल; महाराष्ट्रात हळहळ!

रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे

Hatkanangale : रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या… हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस

महाराष्ट्रात हादरा! भोंदू अशोक खरात प्रकरणात थेट राज्यातील बड्या अधिकाऱ्याचा व्हिडीओ पुढे, मोठी खळबळ, एका..