टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

MI vs RCB : आधी धोनी आता रोहित-विराट आयपीएलमधून OUT का? इंजरीबद्दल समोर आली महत्वाची अपडेट

Follow Us:

Virat-Rohit injury update : काल मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला दुखापत झाली. विराट कोहली आणि रोहित शर्माला झालेली दुखापत आता कशी आहे? धोनी प्रमाणे हे दोघे सुद्धा पुढच्या काही सामन्यासाठी बाहेर होणार का? RCB चा कॅप्टन रजत पाटीदार विराट कोहलीबद्दल काय बोलला? जाणून घ्या.

MI vs RCB : आधी धोनी आता रोहित-विराट आयपीएलमधून OUT का? इंजरीबद्दल समोर आली महत्वाची अपडेट

Rohit Sharma-Virat Kohli : आयपीएल 2026 मध्ये भारतीय क्रिकेटमधील स्टार खेळाडूंच्या मागे दुखापतीचं शुक्लकाष्ट लागलं आहे. आयपीएल 2026 च्या सीजनला सुरुवात होणार त्याच दिवशी चेन्नई सुपर किंग्सचा स्टार खेळाडू महेंद्र सिंह धोनीला दुखापत झाल्याची बातमी आली. धोनी पुढचे दोन आठवडे टुर्नामेंटमध्ये खेळणार नाही अशी माहिती सीएसकेकडून देण्यात आली. धोनी आता मैदानात परतणार अशा चर्चा सुरु झालेल्या असतानाच काल मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याच्यावेळी रोहित शर्मा-विराट कोहलीला दुखापत झाल्याची बातमी आली. त्यामुळे दोन्ही क्रिकेटर्सच्या लाखो फॅन्सचा मोठा हिरमोड झाला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला फलंदाजी दरम्यान ही दुखापत झाली.

रिपोर्ट्सनुसार विराट कोहलीला अँकल इंजरीचा त्रास झाल्याने तो फलंदाजीनंतर फिल्डिंगसाठी मैदानात उतरला नाही. तो ड्रेसिंग रुममध्येच बसून होता. विराट कोहलीने 38 चेंडूत 50 धावा फटकावल्या. विराट कोहलीला ज्या प्रमाणे फलंदाजी करताना अँकल इंजरी झाली तसाच सेम रोहित शर्माला फलंदाजी करताना हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला. फलंदाजी दरम्यान रोहितला त्रास होत असल्याचं दिसलं. अखेरीस त्याने रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडण्याचा निर्णय घेतला.

तो पुन्हा फलंदाजीसाठी उतरला नाही

रोहित रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर परतला, त्यावेळी त्याने 13 चेंडूत 19 धावा केल्या होत्या. रोहित रिटायर्ड होऊन गेल्यानंतर तो पुन्हा फलंदाजीसाठी उतरला नाही, यावरुन त्याची दुखापत किती गंभीर आहे ते लक्षात येतं. रोहितची दुखापत कशी आहे, या बद्दल सध्या काही अपडेट नाहीय. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याने सुद्धा मॅच नंतर रोहितच्या इंजरीबद्दल काही अपडेट दिली नाही.

रजत पाटीदार विराटच्या दुखापतीबद्दल काय बोलला?

विराट कोहलीच्या दुखापतीबद्दल मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कॅप्टन रजन पाटीदारने अपडेट दिली आहे. विराटची दुखापत किती गंभीर आहे, या बद्दल सध्या माहिती नाहीय. पण असं वाटतं की सगळं ठीक आहे. विराटला सध्या कुठला त्रास नाहीय.

मुंबईचा किती धावांनी पराभव

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट गमावून 240 धावा केल्या. प्रत्युत्तरात 241 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या मुंबई इंडियन्सने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 222 धावा केल्या. मुंबईचा 18 धावांनी पराभव झाला.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशनं क्रिकेटचा इतिहास-भूगोलच बदलला! ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती ते घडलं, ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच त्यांच्याच घरात लोळवलं

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला रामराम, सगळ्या फॉर्मेटमधून निवृत्त, Video Viral

IND vs SL: श्रीलंकाविरुद्धच्या टेस्ट मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

6,6,4,4,4,4..! वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वेला दणका, पुन्हा ठोकलं दणदणीत अर्धशतक

Vaibhav Sooryavanshi: थाला बनला वैभवचा फॅन, ‘वंडर बॉय’ने असा सिक्सर मारला की, स्टेडियममध्ये बसलेला धोनीही अवाक; रिअ‍ॅक्शनचा Video Viral

वैभव सूर्यवंशी नावाच्या वादळाची एन्ट्री! जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर विकेटकीपरच्या डोक्यावरून ‘क्लासिक’ षटकार, पाहा Video