टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Follow Us:

Veteran Singer Asha Bhosle Passes Away: सिनेसृष्टीच्या वर्सटाईल सिंगर आशा भोसले यांचं निधन झालं असून वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Veteran Singer Asha Bhosle Passes Away: ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचं निधन झालं असून वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतरत्न आणि ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर (Younger Sister Of Legendary Lata Mangeshkar) यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले (Versatile Playback Singer Asha Bhosle) यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं. तब्बल सहा दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिलाय. त्यांनी केवळ हिंदीतच नाहीतर, मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायलीत. हिंदी सिनेसृष्टीतील (Hindi Film Industry) दिग्गज संगीतकार आरडी बर्मन (R. D. Burman), ओपी नैय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली. ‘दम मारो दम’ आणि ‘ओम शांति ओम’ यांसारखी अनेक सुपरहिट गाणी आशा भोसले यांनी इंडस्ट्रीला दिलीत.

आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी माध्यमांसमोर येऊन आशा ताईंच्या निधनाची बातमी साश्रू नयनांनी दिली. तसेच, आशाताईंवर उद्या (सोमवारी) सकाळी अकरा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत त्यांचं अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर आशा भोसले यांची अंत्ययात्रा निघेल आणि सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

आशा भोसले यांना प्रकृती अस्वास्थामुळे तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिनं सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या आजीच्या प्रकृतीबाबत माहिती दिलेली. तिनं सांगितलेलं की, “माझ्या आजीला चेस्ट इंफेक्शन आणि खूपच अशक्तपणा आलाय… त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय… कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर राखा, तिच्यावर उपचार सुरू आहेत… ती लवकरच बरी होईल…”

ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली 

प्रकृती अस्वास्थामुळे आशा भोसले यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. तिथेच उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिग्गज गायिकेच्या निधनानं संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. अशातच ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Ashok Kharat : नाशिक, शिर्डी, पुणे अन् आता सोलापूर; अशोक खरातने शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या परिसरात घेतली 11 एकर जमीन, किंमत 2 कोटी 41 लाख अन्…

School Bus News Rules: पालकांना आर्थिक दिलासा, शालेय बसचे भाडे आता सरकार ठरवणार; राज्यातील्या स्कूल बस चालकांची मनमानी मोडीत निघणार

आर्टेमिस II मोहिमेतील चार अंतराळवीर चांदोमामाच्या उंबरठ्याला स्पर्श करून पृथ्वीवर परतले! तब्बल 5 दशकांनंतर मानव चंद्राच्या इतक्या जवळ पोहोचला

CM Relief Fund: मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत मोठा बदल; रुग्णांना अवघ्या 8 तासांत कळवला जाणार मदतीचा निर्णय

बापरे! अशोक खरातची भविष्यवाणी खरी ठरणार? दिल्लीत मोठ्या हालचाली, नेमंक काय घडतंय?

Iran – US : पाकिस्तानच्या मध्यस्थीचे तीन तेरा, जगाला हादरवणारी घटना, पुन्हा उडणार युद्धाचा भडका? घोंगावतंय मोठं संकट…