टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Gold Price Today : सराफा बाजारात मोठी घडामोड, युद्धविरामानंतर 3 दिवसांनी… सोन्याचे आजचे दर…

On: April 11, 2026 10:24 AM
Follow Us:

Gold Price Rate Today 11 April 2026 Latest News Updates in Marathi : इराण-अमेरिका युद्धविरामानंतरही सोनं-चांदीच्या दरांवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलं. गेल्या काही काळापासू सोनं चांदीचे दर सतत वर-खाली होत आहेत. सोनं-चांदीच्या किमतींवर देशांतर्गत तसेच जागतिक घटकांचा प्रभाव पडला असून आज 11 एप्रिल रोजी सोनं आणि चांदीचे दर किती ते जाणून घेऊया.

Gold Price Today : सराफा बाजारात मोठी घडामोड, युद्धविरामानंतर 3 दिवसांनी... सोन्याचे आजचे दर...

सर्वसामान्य लोकांना सोनं, सोन्याचे दागिने खरेदी करण्यात खूपच रस असतो, पण सध्या सोन्याचे भाव ज्या वेगाने वर गेलेले दिसतात त्यामुळे त्यांना खरेदी करताना 10 वेळा विचार करावा लागतो. आजही देशातील सोनं-चांदीचे दर सतत वरखाली होत असून गेल्या काही दिवसांपासून हाच ट्रेंड दिसत आहे. इराण-अमेरिका युद्धादरम्यान आणि नंतरही सोन्याच्या तसेच चांदीच्या दरातत सतत चढउतार झालेले दिसून आले. जागतिक अस्थिरता , अशांतता यामुळे मौल्यवान धातूंचे दर जागितक स्तरावर बदलत होते. त्याचा परिणा देशांतर्गत बाजारातही दिसून आला.

दरम्यान आज सराफा बाजारातून मोठी अपडेट समोर आली आली आहे. एका दिवसाच्या घसरणीनंतर देशात सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. शनिवार 11 एप्रिलच्या सकाळी, राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,52,510 रुपयांवर पोहोचला आहे. मुंबईत हा भाव प्रति 10 ग्रॅम 1,52,360 रुपये इतका आहे. आदल्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 400 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 1,55, 300 रुपयांवर पोहोचला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस 4,777.17 डॉलर आहे.

देशातील प्रमुख शहरातील भाव काय ?

आज राजधानी दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,52,510 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,39, 810 रुपये इतका आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि कोलकाता येथे 24 कॅरेटचं 1 तोळे, 10 ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी 1लाख 52 हजार 360 रुपये आणि 22 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी 1 लाख 39 हजार 660 रुपये मोजावे लागणार आहेत.

चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1 लाख 54 हजार 100 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमसाठी 1, 41, 260 रुपये मोजावे लागणार आहेत. पुणे आणि बंगळूरू या दोन्ही शहरांमध्ये, 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,52,360 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,39,660 रुपये आहे.

शहर 22 कॅरेट सोन्याचे दर 24 कॅरेट सोन्याचे दर
दिल्ली 139810 152510
मुंबई 139660 152360
अहमदाबाद 139710 152410
चेन्नई 141260 154100
कोलकाता 139660 152360
हैदराबाद 139660 152360
जयपुर 139810 152510
भोपाळ 139710 152410
लखनऊ 139810 152510
चंदीगड 139810 152510

चांदीच्या दराची स्थिती कशी ?

आज सोन्याप्रमाणेच चांदी या मौल्यवान धातूच्या दरातही वाढ झालेली दिसून आली. शनिवार, 11 एप्रिलच्या सकाळी, चांदीचे दर प्रति किलोग्राम 2,60, 100 रुपयांपर्यंत वाढला आहे. आदल्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा दर 3800 रुपये किंवा 1.6 टक्क्यांनी वाढून प्रति किलोग्राम 2,47, 000 रुपयांवर पोहोचला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट भाव प्रति औंस 75.91 डॉलर आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात देशात चांदीचे दर 4 लाखांपार गेले होते. मात्र आता उच्चांकापेक्षा हे दर कमी आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Horoscope Today 22nd August 2026 : आज ग्रहांची चाल बदलणार चित्र ! मेष ते मीन जाणून घ्या राशिभविष्य

Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती

एका आयफोनमुळे गेला तिघांचा जीव, छत्रपती संभाजीनगरमध्ये डोंगरावरून पडून आई वडील अन् मुलाचा मृत्यू

Plane crash : विमानाचा भीषण अपघात, लँडिगच्या तयारीमध्ये असताना थेट खाली कोसळलं, सर्व प्रवाशांचा मृत्यू

आश्रमशाळेतील तीन विद्यार्थींनीचा मृत्यू, महाराष्ट्रातील हादरवून सोडणारी घटना

महायुतीत पुन्हा धुसफूस ? शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळेच आज भाजप सत्तेत, त्या पोस्टने सगळंच बाहेर आलं