टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

महाराष्ट्र हादरला! या जिल्हांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये पळापळ

Follow Us:

सुदैवाने या सौम्य भूकंपामुळे कोठेही जीवित किंवा वित्तीय नुकसान झाल्याची वृत्त नाही. लोक काही क्षण भीतीने घराबाहेर पडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नंतर परिस्थिती नॉर्मल झाली.

महाराष्ट्र हादरला! या जिल्हांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये पळापळ

आज सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. वाशिम शहरातील काही भागांबरोबरच यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेबाळपिंपरी परिसरात आणि नांदेड शहर व परिसरात हे हलके धक्के बसले. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या वेळी भूगर्भातून मोठा आवाज आला आणि त्यानंतर जमीन हलल्यासारखे जाणवले. नांदेडमध्ये हा धक्का ८ वाजून ४६ मिनिटांनी जाणवला.

कोणकोणत्या भागात जाणवले धक्के?

वाशिम शहर – वाशिम शहर आणि आजूबाजूच्या परिसरात काही ठिकाणी 8 वाजून 45 मिनिटांनी सौम्य धक्का जाणवला.

यवतमाळ जिल्हा – यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात शेबाळपिंपरी भागात 8 वाजून 45 मिनिटाने भूकंपाचे धक्के जाणावले.

नांदेड शहर व परिसर – नांदेड शहर आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का 8 वाजून 46 मिनिटांनी जाणवला.

सुदैवाने या सौम्य भूकंपामुळे कोठेही जीवित किंवा वित्तीय नुकसान झाल्याची वृत्त नाही. लोक काही क्षण भीतीने घराबाहेर पडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नंतर परिस्थिती नॉर्मल झाली.

Hingoli Earthquake  : घरामध्ये ठेवलेली भांडी आणि वस्तू जमिनीवर कोसळून पडले, अनेकांच्या घराला तडे

हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज सकाळी आठ वाजून 47 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. हिंगोली जिल्ह्यांमध्ये दरवेळेस भूकंपाचे धक्के जाणवत असतात. मात्र यावेळेसचा भूकंपाचा धक्का हा मोठ्या प्रमाणात असल्याचं नागरिक सांगत आहेत. भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर अनेक गावातील घरामध्ये ठेवलेली भांडी आणि वस्तू जमिनीवर कोसळून पडले आहेत. तर अनेकांच्या घराला तडे गेल्याची सुद्धा प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा भूकंपाचा धक्का हिंगोली जिल्ह्यासह नांदेड, परभणी या जिल्ह्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात जाणवलेला आहे.

Earthquake News : 4.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद

हिंगोली जिल्ह्यातील संपूर्ण गावांना या भूकंपाच्या धक्के जाणवल्याची माहिती असून अद्याप पर्यंत कोणतीही जीवित हानी झाल्याची माहिती समोर आली नाही. मात्र भूकंपानंतर भयभीत झालेले नागरिक तत्काळ घराच्या बाहेर आले होते. तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असा आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे. या भूकंपाचे अद्याप प्रशासन स्तरावर कोणतीही नोंद झाली नसली तरी प्रशासनाच्या वतीने या भूकंपाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. भूकंपाचे केंद्रबिंदू पांगरा शिंदे गाव भूकंपाची नोंद झाली असून 4.7 रिश्टर स्केलचा हा भूकंप झाला आहे.

Hingoli Earthquake  : भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात असल्याची माहिती

दुसरीकडे, नांदेडमध्ये देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे. शहरातील सिडको, वजीराबाद, आनंद नगर, तरोडा सांगावी भागात हे धक्के प्रकर्षाने जाणवले आहेत. मिलेल्या माहितीनुसार, 4.7 रिस्टर स्केलचा हा भूकंप असल्याची माहिती आहे. वसमत येथील पांगरा शिंदे येथे 10 किमी खोलीवर भुकंपाचे केंद्र असून भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात असल्याची माहिती आहे. तर तिकडे, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात शेबाळपिंपरी भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे. 8 वाजून 45 मिनिटाने हा धक्का जाणवला आहे.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NCS) कडून अद्याप अधिकृत मॅग्निट्यूड आणि केंद्रबिंदूची माहिती समोर आलेली नाही. मात्र, स्थानिक नागरिकांच्या अनुभवांनुसार हा धक्का अतिशय हलका होता. भूकंपप्रवण क्षेत्र मानल्या जाणाऱ्या विदर्भ-मराठवाडा भागात असे सौम्य धक्के अधूनमधून जाणवत असतात. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणतीही अफवा पसरवू नये असे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 13 एप्रिल 2026 | सोमवार

इराणसोबत चर्चा फेल होताच पाकिस्तानने उचललं मोठं पाऊल, 13 हजार सैनिक सौदी अरेबियात दाखल

Hardik Pandya vs Krunal Pandya : पंड्या ब्रदर्समधली फूट चव्हाट्यावर ? ना हँडशेक, आऊट झाल्यावर आक्रमक सेलिब्रेशन

South Cinema Actor Harish Died: सिनेसृष्टी हादरली; टँकरला कारची जोरदार धडक, भीषण रस्ते अपघातात 40 वर्षांच्या सुप्रसिद्ध अभिनेत्यावर काळाचा घाला

Pandharpur Crime News: पंढरपूर ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट! तरुणीनेच रचला स्वतःवर हल्ल्याचा बनाव; पोलिसांनी असा उघड केला बनाव

मोठी बातमी ! होर्मुज स्ट्रेटमध्ये आजपासून नाकाबंदी, ट्रम्प यांच्या निर्णयाने भारताला बसणार फटका