टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

एसटी महामंडळाचा प्रवाशांना मोठा दणका, बसच्या भाड्यात वाढ, 15 तारखेपासून नवे दर लागू

मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात महागाई वाढत असतानाच आता प्रवाशांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. एसटीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

एसटी बस अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या बस सर्वसामान्य प्रवाशांसाठी मोठा आधार असतात. लांब पल्ल्याच्या प्रवासाठी आजही अनेकजण लालपरीलाच प्राधान्य देतात. एसटीचा प्रवास हा सुरक्षित आणि स्वस्त मानला जातो. त्यामुळे प्रवाशांचा एसटी बसच्या प्रवासावर विश्वास आहे. मात्र आता राज्य परिवहन महामंडळानं प्रवाशांना मोठा झटका दिला आहे. एसटी महामंडळाकडून बसच्या भाड्यात हंगमी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळानं प्रवासी भाड्यात 10 टक्क्यांनी वाढ केली आहे. येत्या 15 एप्रिलपासून प्रवाशांकडून सुधारीत दराने तिकीट आकारण्यात येणार आहे. महागाईमुळे सर्वसामन्य लोक आधीच हैराण आहेत, त्यात आता राज्य परिवहन महामंडळाने देखील प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानं ग्राहकांच्या खिशावर याचा भार पडणार आहे.

प्रवाशांची नाराजी

दरम्यान एसटी महामंडळानं आता एसटीच्या भाड्यात हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या भाड्यामध्ये 10 टक्के वाढ करण्यात आली आहे. येत्या 15 एप्रिलपासून एसटीचे नवे दर लागू होणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना प्रवाशांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. एसटीच्या या निर्णयावर प्रवाशांकडून संप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचं पहायला मिळत आहे. ‘महिलांसाठी अर्ध टिकीट करता आणि इकडे प्रवास भाडे वाढवता, त्यापेक्षा एसटीच बद करू टाका. श्रीमंत लोक एसटीने प्रवास करत नाहीत, भाव वाढ ही गरिबांच्या खिशाला कात्री आहे. तिकटाची दरवाढ कमी करून गरिबांना दिलासा दिला पाहिजे. ‘ अशा प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत आहेत.

उन्हाळ्यामध्ये प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता

मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे अनेक जण उन्हाळ्यात प्रवासाचा बेत आखत असतात. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये एसटी बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. मात्र ऐन याच काळात आता एसटी महामंडळाकडून हंगामी भाडेवाढ करण्यात आली आहे. त्याचा मोठा फटका हा आता प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. प्रवाशांना भाडेवाढीमुळे मोठी आर्थिक झळ बसणार आहे. यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींचे कर्ज माफ होणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर प्रहार

Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम

Maharashtra Rain Konkan: पहिल्याचं पावसात घटप्रभा नदीचं रौद्ररुप; सावंतवाडीमधील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, PHOTO

मान्सून लांबला… १५ जूनपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कमी, हवामान खात्याची मोठी माहिती