Sangli News: गोपीचंद पडळकर अन् खासदार विशाल पाटील यांच्यात जुंपली आहे. विशाल पाटील पुढचे खासदार नसणार त्यासाठी आपण जीवाचं रान करू, असं आमदार गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय.

सांगली : 2029च्या लोकसभा निवडणुकीवरून (Loksabha Election) भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यात पुन्हा जुंपली आहे. विशाल पाटील (Vishal Patil) पुढचे खासदार नसणार त्यासाठी आपण जीवाचं रान करू असे म्हणत आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी विशाल पाटील (Vishal Patil) यांना आव्हान दिले आहे, तर माझ्याविरुद्ध एक लोकसभा निवडणुक लढवून माझ्यापेक्षा कमी मते मिळणारे खासदारकीची स्वप्ने पाहत असतील तर ते स्वप्न धुळीस मिळेल असे म्हणत खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना प्रत्युत्तर दिले आहे.
Gopichand Padalkar VS Vishal Patil : जतचे अध्यक्षपद ज्यांनी-ज्यांनी घालवलं आहे, त्यांचा-त्यांचा कार्यक्रम होणार
विशाल पाटील पुढचे खासदार नसणार त्यासाठी आपण जीवाचं रान करू आणि 2029 मध्ये सगळ्यांचा कार्यक्रम करू, असा गर्भित इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार विशाल पाटील यांना दिला आहे. तसेच जतचे अध्यक्षपद ज्यांनी-ज्यांनी घालवलं आहे, त्यांचा-त्यांचा कार्यक्रम होणार, हे जाहीरपणे सांगतो असे म्हणत सांगली जिल्हा परिषदेतल्या पराभवानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार विशाल पाटील आणि आमदार जयंत पाटलांनी हा इशारा दिला आहे.
Gopichand Padalkar VS Vishal Patil : मोठ्या लोकांच्यावर बोलून मते मिळतील हे स्वप्न धुळीस मिळेल
ज्यांनी माझ्याविरुद्ध एक लोकसभा निवडणुक लढवली आणि माझ्यापेक्षा कमी मते मिळाली ते आता खासदारकीची स्वप्ने पाहत असतील. पण जातीवाद करून एखादी निवडणूक जिंकली असेल पण त्यांनी विसरू नये की तुमचा कितीतरी वेळा पराभव झाला आहे. जिल्ह्यातील मोठ्या लोकांच्यावर बोलून मते मिळतील हे स्वप्न धुळीस मिळेल असे म्हणत खासदार विशाल पाटील यांनी पडळकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. पण ज्या ज्या मतदारसंघात भाजपचा पराभव होऊ शकतो त्या ठिकाणी भाजप राखीव मतदारसंघ करण्याचा प्रयत्न करू शकेल. ज्या वेळी याबतबतचे चित्र स्पष्ट होईल त्यावेळी निर्णय घेऊ असेही खासदार विशाल पाटील म्हणालेत.
Gopichand Padalkar VS Vishal Patil : 2029 मध्ये सांगली जिल्ह्यात भाजपाचे खासदार झाले पाहिजे
2029 मध्ये सांगली जिल्ह्यात भाजपाचे खासदार झाले पाहिजे. दोन्ही ठिकाणी भाजपचे खासदार झाले पाहिजे,अशी शपथ घ्या,असे आवाहन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. सांगलीमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या भाजपच्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.







