टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोला : 67 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी हालचालींना वेग

अनकढाळ सरपंचपदासाठी थेट जनतेतून लढत; एप्रिल अखेरीस मतदान

सांगोला :- सांगोला तालुक्यातील अनकढाळ ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी पदाचा राजीनामा दिल्याने त्याठिकाणी सरपंच पदासाठी तर चिनके प्रभाग -3 मधील सदस्याने राजीनामा दिल्यामुळे तर चिकमहूद व खवासपूर येथील सदस्यांच्या मृत्यूच्या कारणाने या ठिकाणी निवडणूक होणार आहे.दरम्यान अनकढाळ ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून होणार आहे. त्यामुळे गाव पातळीवरील राजकीय पक्षाचे नेते मंडळी, पदाधिकारी कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

सांगोला तालुक्यातील अनकढाळ सरपंच पदासाठी तर चिणके खवासपूर व चिकमहूद येथील प्रत्येकी सदस्य पदाच्या एक जागेसाठी 17 मार्च 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे त्यानुसार 7 एप्रिल ते 13 एप्रिल या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करणे सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत ,15 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी सकाळी 11 ते छाननी संपेपर्यंत , नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची मुदत 17 एप्रिल दुपारी 3 वाजेपर्यंत असून , त्याचदिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप केले जाणार आहे 28 एप्रिल रोजी सकाळी 7:30 ते सांयकाळी 5:30 मतदान होणार आहे .मतमोजणी 29 एप्रिल रोजी तहसील कार्यालयाकडून निश्चित होणार्‍या ठिकाणी होणार आहे.

मुदत संपलेल्या 62 ग्रामपंचायतीच्या प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम पूर्ण झाला असून प्रारुप प्रभाग रचनेवर येत्या 4 एप्रिल ते 13 एप्रिल पर्यंत हरकती घेण्यात येणार आहेत. नियोजित कालावधीत हरकती प्राप्त झाल्यास तहसीलदार सांगोला यांच्यासमोर सुनावणी होऊन पुढील उचित कार्यवाही होणार आहे. अंतिम प्रभाग रचना प्रसिद्धीनंतर निवडणूक आयोगाच्या आदेशाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दोन निवडणूक निर्णय अधिकारी व चार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक तहसीलदार श्रीमती बाळूताई भागवत यांनी केली आहे

बागलवाडी गळवेवाडी राजापूर सोनलवाडी सोनंद या पाच ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना सन 2024 मध्ये झालेली आहे त्यामुळे 62 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसोबतच सदर पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

थकबाकीदार गाळेधारकांना नगरपरिषदेचा दणका; भाजी मंडईतील गाळा सील, वसुली पथकाची धडक कारवाई

सांगोला तालुक्यातील प्रलंबित जमीन मोजणी प्रकरणांना लवकरच गती; आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

कोळा व बुद्धेहाळ परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांची मागणी

सांगोला विधीज्ञ संघाचे अध्यक्षपदी अ‍ॅड.विशालदिप बाबर

विश्वासघाताचा कळस: स्वतःच्याच मालकाला लुटणाऱ्या ड्रायव्हरचा सांगोला पोलिसांनी केला पर्दाफाश; चौघे जेरबंद

सांगोल्यात भीषण अपघात: अनियंत्रित टमटमने बैलगाड्यांना उडवले; एका महिलेसह बैलाचाही जागीच मृत्यू