टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

MI vs KKR : IPL मध्ये आज मुंबई वि. केकेआर भिडणार, हेड टू हेड रेकॉर्डमध्ये पलटण भारी

Follow Us:

MI vs KKR Head to Head : आयपीएल २०२६ मधील दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि केकेआरमध्ये होणार आहे. या सामन्याआधी दोन्ही संघांची हेड टू हेड आकडेवारी पाहिली तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. मुंबईचं पारडं जड आहे मात्र केकेआरचे मागील चार सीझनमधील निकाल आणि मुंबईचा पहिली मॅच हरण्याचा विक्रम पाहिला तर पलटणसाठी धोक्याची घंटा असणार आहे.

मुंबई : आयपीएल 2026 मधील स्पर्धेमधील मुंबई इंडियन्स संघाचा आज पहिला सामना केकेआर सोबत होणार आहे. मुंबईमधील वानखेडे मैदानावर हा सामना पार पडणार आहे. जवळपास 2013 पासून मुंबईने आपला पहिला सामना जिंकलेला नाही त्यामुळे या खराब विक्रमाचा काहीसा दबाव पलटणवर पाहायला मिळेल. मुंबई हा आयपीएलमधील सर्वाधिक पाच ट्रॉफी जिंकणारा संघ आहे, तर केकेआरनेही तीन विजेतेपदांवर आपलं नाव कोरलं आहे. मुंबई यांनी केकेआरमधील मधील हेड टू हेड आकडेवारी जर पाहिली तर मुंबईचे पारडे जड आहे. पण हीच आकडेवारी जर गेल्या चार सीजनमधील पाहिली तर मुंबईसाठी मोठा धोका आहे. कारण धडकी भरवणारे आकडे आहेत, जाणून घ्या.

मुंबई आणि कोलकातामधील हेड टू हेड आकडेवारी पाहिली तर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ३५ सामने झाले आहेत. यामधील २४ मुंबईने तर केकेआरने फक्त ११ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे मुंबईचा रेकॉर्ड तसा तगडा आहे पण गेल्या चार वर्षातील आकडेवारी पाहिली तर मुंबईसाठी धोक्याची घंटा असू शकते. कारण मुंबई आणि केकेआरमध्ये मागील ४ सीझनमध्ये एकूण ६ सामने झाले आहेत. त्यामधील दोनच सामन्यात मुंबई जिंकलेली आहे. तर केकेआरने चारवेळा बाजी मारली आहे.

वानखेडे पिच रिपोर्ट

Wankhede Stadium Pitch Report: क्या बनेगा 200+ स्कोर या गेंदबाज मचाएंगे  कहर, PITCH की अपडेट आई सामने

खेळपट्टीचा अंदाज चेंडू चांगला उसळतो तसेच बँटवरही येत असल्यामुळे फलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी असा लौकिक, त्यातच कमी अंतरावरील सीमारेषाही साथ देणारी. दवाचा परिणाम अपेक्षित असल्यामुळे असणार आहे. हवामानाचा अंदाज: स्वच्छ वातावरण, पण ७० ते ८० टक्के आर्द्रता खेळाडूंचा कस पाहणार, त्यामुळे उकाड्याचेही आव्हान. फारसे वारे वाहण्याची शक्यता कमी. उत्तरार्धात दव पडू शकते त्यामुळे त्यानुसार संघ व्यवस्थापन निर्णय घेऊ शकतात.
दरम्यान, मागील रेकॉर्ड कसेही असले तरी आजच्या सामन्यात खेळताना दोन्ही संघ आपली ताकद लावतील. त्यामुळे सीझनच्या पहिल्या सामन्यात विजयाचा श्रीगणेशा कोण करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशनं क्रिकेटचा इतिहास-भूगोलच बदलला! ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती ते घडलं, ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच त्यांच्याच घरात लोळवलं

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला रामराम, सगळ्या फॉर्मेटमधून निवृत्त, Video Viral

IND vs SL: श्रीलंकाविरुद्धच्या टेस्ट मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

6,6,4,4,4,4..! वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वेला दणका, पुन्हा ठोकलं दणदणीत अर्धशतक

Vaibhav Sooryavanshi: थाला बनला वैभवचा फॅन, ‘वंडर बॉय’ने असा सिक्सर मारला की, स्टेडियममध्ये बसलेला धोनीही अवाक; रिअ‍ॅक्शनचा Video Viral

वैभव सूर्यवंशी नावाच्या वादळाची एन्ट्री! जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर विकेटकीपरच्या डोक्यावरून ‘क्लासिक’ षटकार, पाहा Video