टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

नुकसानग्रस्त शेतीपिके आणि फळबागांचे सरसकट पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी -चेतनसिंह केदार सावंत 

Follow Us:

जि.प.सदस्य चेतनसिंह केदार सावंत यांची पालकमंत्री, जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला तालुक्यातील शेतकर्‍यांना अवकाळी पावसाने झोडपल्याने सांगोला तालुक्यातील डाळिंब, द्राक्ष, केळी, आंबा, पेरू यासह इतर फळबागांचे आणि ज्वारी, मका, गहू तसेच पालेभाज्या या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके व फळबागा हातातून जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे.नुकसानग्रस्त सर्व शेतकर्‍यांचे सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई द्यावी अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य चेतनसिंह केदार सावंत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, तहसीलदार बाळूताई भागवत यांच्याकडे केली आहे.

सांगोला शहर आणि तालुक्यात दोन दिवस अवकाळी पावसाने तसेच गारपीटीने झोडपल्याने डाळिंब, केळी, द्राक्ष, आंबा, पेरू, सीताफळ, चिकू यासह इतर फळबागा आणि रब्बी हंगामातील ज्वारी, मका, गहू यासह तरकारी पिकांचे प्रचंडनुकसानझाले आहे. अवकाळी पाऊस आणि वादळी वारे यामुळे शेतातील उभी पिके कोलमडून पडली तर द्राक्ष पिकांना घडकुज कुजवा रोगांचा प्रादुर्भाव वाढला. मोहोर अवस्थेत असलेल्या आंब्याच्या बागांनाही ढगाळ वातावरण अवकाळी पाऊस आणि वादळी वार्‍याचा फटका बसला आहे. मोहोर गळून गेल्याने आंबा उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. दुष्काळी परिस्थितीशी झगडत जतन केलेल्या फळबागा अवकाळी पावसाने उद्दवस्त झाल्याने शेतकर्‍यासमोर आर्थिक संकट उभा राहिले आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकर्‍यांना वार्‍यावर न सोडता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून सरसकट पंचमाने करून भरपाई द्यावी अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य चेतनसिंह केदार सावंत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, तहसीलदार बाळूताई भागवत यांच्याकडे केली आहे.

वादळी वारे आणि अवकाळी पावसाळे शेती पिकांचे आणि फळबागांचे प्रचंड नुकसानझाले आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने तात्काळनुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी. अनेक शेतकरी आपली पिके जगवण्यासाठी संघर्ष करत होते. वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणातनुकसानझाले आहे.अशा परिस्थितीत शेतकरी, नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी महसूल विभागाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून असा अहवाल तहसील कार्यालयाकडे सादर करून नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य चेतनसिंह केदार सावंत यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now